Dhule Farmer E-KYC : ‘ई-केवायसी’ न केल्यामुळे पीएम किसान सन्मान निधीसह विविध योजनांच्या लाभापासून जिल्ह्यातील सहा हजार १८० शेतकरी वंचित असल्याचे समोर येत आहे. या लाभार्थ्यांसाठी प्राप्त पाच कोटी ६८ लाख ७१ हजार ५०७ रुपयांचे अनुदान शासकीय तिजोरीत पडून आहे. शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ‘ई-केवायसी’ प्रक्रिया प्रलंबित असल्याने मिळण्यास अडचण होते. शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने सातत्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी यादृष्टीने आवाहन केले. त्यास पूर्णतः प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर येत आहे. (lack of eKYC over 6 thousand beneficiaries are deprived )