Dhule Viral Infection: ‘व्हायरल इन्फेक्शन’मुळे असंख्य धुळेकर बेजार! हवामान बदलाचा परिणाम; विविध रुग्णांच्या संख्येत वाढ

Dhule News : रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे, तर अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या जत्रेचे स्वरूप दिसू लागले आहे.
Viral Infection
Viral Infectionesakal
Updated on

धुळे : शहरासह जिल्ह्यातील हवामान, वातावरण बदलाचा परिणाम असंख्य धुळेकरांवर आरोग्यावर जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘व्हायरल इन्फेक्शन’, निरनिराळ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयातही साथीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे, तर अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या जत्रेचे स्वरूप दिसू लागले आहे. (Due to viral infection many people sick)

महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे फवारणी, अ‍ॅबेटिंगला सुरुवात झाली आहे. तापाच्या २४ संशयित रुग्णांचे रक्त नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

आरोग्य विभाग सतर्क

हवामानातील बदल आणि त्यातच रिपरिप पावसामुळे काही दिवसांपासून ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयात ताप, मळमळ, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी व उलटीसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. धुळेकरांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन निरनिराळ्या आरोग्य यंत्रणेने केले आहे.

साथीच्या आजाराचे रुग्ण

रुग्णालयांमध्ये रोज दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी अधिक रुग्ण साथीच्या आजारांचे आहेत. रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात बहुसंख्य रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. यामध्ये अनेक रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे उपचारासाठी येत आहेत. वातावरणात सध्या कमालीचा बदल झाला आहे.

कधी पाऊस, तर कधी ऊन पडत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. या वातावरणामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वयोवृद्ध तसेच लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे. (latest marathi news)

Viral Infection
Nashik Viral Infection Disease: हर घर सर्दी, खोकला तापाचे रुग्ण! बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ

त्यामुळे रुग्णालयांमध्ये तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग तसेच डोकेदुखीचे विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, अन्य कोणत्याही प्रकारची साथ नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले.

संशयितांचे २४ नमुने प्रयोगशाळेत

महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे फवारणी, अ‍ॅबेटिंगला प्रारंभ झाला आहे. तापाच्या संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यानुसार २४ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वातावरणात बदल झाल्याने ताप, थंडी, खोकला, अंगदुखी, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेने २२ ते २७ जुलैदरम्यान तापाच्या २४ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

"हवामानातील बदलामुळे साथीचे व संसर्गजन्य आजार वाढते आहेत. ते लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे अपेक्षित आहे. बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. तसेच पाणीदेखील उकळून घ्यावे. ग्रामीण रुग्णालयात साथीच्या आजारांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे."

- डॉ. महेश भडांगे, जिल्हा शासकीय रुग्णालय, धुळे

Viral Infection
Dhule News : हद्दवाढीत एक कोटीतून खडी-मुरमाचे रस्ते; धुळे मनपातर्फे कामास प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.