Nandurbar Earthquake : भूकंपाचे धक्के सौम्य प्रकारातील; तीव्रता 2.3 रिश्‍चर स्केलपर्यंत

Earthquake : तालुक्यातील खोकसा, दापूर, करंजो बुद्रुक, उचोमौली या गावात व परिसरात २ ऑक्टोबरपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत.
Earthquake
EarthquakeEsakal
Updated on

नवापूर : तालुक्यातील खोकसा, दापूर, करंजो बुद्रुक, उचोमौली या गावात व परिसरात २ ऑक्टोबरपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. हे धक्के अतिशय सौम्य प्रकारातील असून, यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले. (Earthquake tremors of moderate intensity up to 2 on Richter scale)

गांधीनगर येथील भूकंपमापक यंत्रणेकडील प्राप्त माहितीनुसार तालुक्यात २ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून १९ मिनिटाला २.३ तीव्रता व ४ ऑक्टोबरला रात्री १० वाजून १८ मिनिटाला कडवान परिसरात २.२ तीव्रता (४० कि.मी.), ५ ऑक्टोबरला रात्री एक वाजून ३९ मिनिटाला १.२ तीव्रतेच्या धक्क्याची नोंद झाली आहे.

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी ४ ऑक्टोबरला गावांना भेटी देऊन पाहणी केली. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग व नाशिक येथील मेरी संस्थेतील वैज्ञानिक ६ व ७ ऑक्टोबरला परिसरातील सर्व गावांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. (latest marathi news)

Earthquake
Sangli Earthquake: सांगली हादरलं! चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के; वारणा धरणाला धोका आहे का? प्रशासनाने दिली अपडेट

...तर लागलीच कळवा

ग्रामस्थांनी आपल्या भागात कूपनलिकेची पातळी कमी होणे, पाणी आपोआप बाहेर येणे, जमिनीला भेगा पडणे आदी बदल निदर्शनास आल्यास तत्काळ प्रशासनास कळवावे, खोकसा, दापूर, करंजी बुद्रुक व परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

याबाबत काही संपर्क करावयाचा झाल्यास तहसीलदार दत्तात्रय जाधव (भ्रमणध्वनी ः ७५८८६०४२८५) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. तहसीलदार जाधव, विसरवाडीचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे, मंडल अधिकारी व तलाठी नियमित भेट देऊन परिसरातील सरपंच, पोलिसपाटील, नागरिक, शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी संवाद साधत माहिती घेत आहेत.

शंका खरी ठरली

खोकसा, दापूर, करंजो बुद्रुक, उचोमौली या गावात व परिसरात भूकंपाचे धक्के बसतात, आवाज येतात. या भीतीने नागरिकांनी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रात्रभर जागून काढली. याबाबत प्रशासनाकडे मदत मागितली, तेव्हा प्रशासनाने असा कुठलाही प्रकार नाही, असे सांगितले होते. प्रशासनाने अशा माहितीकडे गांभीर्याने पाहावे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Earthquake
Earthquake in Vidarbha : अमरावतीसह अकोट तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.