Dhule Cloud Burst : शिंदखेड्यातील विखरण, शेवाडे, चिमठाणे मंडळात ‘ढगफुटीसदृश्य’चा परिणाम

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विखरण महसूल मंडळात १६०, शेवाडे मंडळात ११६ व चिमठाणे महसूल मंडळात ९५ मिलिमीटर एवढा, तर विरदेल मंडळात फक्त पाच मिलिमीटर पाऊस झाला.
Damage to the car due to the collapse of the wall of the mud house, damage to the cotton crop due to water in the field of farmer Pradeep Singh Girase.
Damage to the car due to the collapse of the wall of the mud house, damage to the cotton crop due to water in the field of farmer Pradeep Singh Girase.esakal
Updated on

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास विखरण महसूल मंडळात १६०, शेवाडे मंडळात ११६ व चिमठाणे महसूल मंडळात ९५ मिलिमीटर एवढा, तर विरदेल मंडळात फक्त पाच मिलिमीटर पाऊस झाला. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या मंडळातील शेतातील कपाशी, मका आदी पिके वाहून गेली. (Effect of cloudburst in Shindkheda taluka)

तर मातीची घरे पडून नुकसान झाले. आरावे येथील पोल्टीफार्ममध्ये पाणी शिरल्याने तीन हजार ९०० कोंबड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पंचनामे करण्याचे आदेश प्रभारी तहसीलदार संभाजी पाटील यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील विखरण, शेवाडे, चिमठाणे.

शिंदखेडा व खलाणे महसूल मंडळात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आहेत. तालुक्यातील तामथरे, सवाई-मुकटी, अमराळे, जखाणे, आरावे, भडणे, शेवाडे आदी गावांतील नाल्यांना पूर, शेतातील पाणी बुराई नदीपात्रात वाहून आल्याने रात्री बुराई नदी दुथडी भरून वाहत होती.

घरांची पडझड, कोंबड्यांचा मृत्यू

पावसाने आरावे येथील शेतकरी केशव बाबूलाल कंखर यांच्या गट क्रमांक १०४/२/१ मध्ये असलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये पाणी शिरून तीन हजार ९०० ब्रॉयलर जातीच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. तामथरे, अमराळे, आरावे, जखाणे, चिलाणे, रंजाणे, जसाने, कुरूकवाडे, दोंडाईचा, मेथी, अंजनविहरे, मांडळ, विखरण. (latest marathi news)

Damage to the car due to the collapse of the wall of the mud house, damage to the cotton crop due to water in the field of farmer Pradeep Singh Girase.
Dhule News : माजी नगराध्यक्ष पवारचा जामीनाबाबत अर्ज नामंजूर! पाटील पितापुत्र खून प्रकरणी खंडपीठात कामकाज

आलाणे, लोहगाव, कुंभारे, आच्छी आदी गावांतील शेतात पाणी शिरून कपाशी, मका आदी पिके वाहून गेली आहेत. दराणे येथील शेतकरी विमलबाई हिंमत पवार यांच्या घराची भिंत कोसळून डॉ. माळी यांच्या स्विफ्ट गाडीचे नुकसान झाले. तसेच हिरालाल श्यामराव पवार यांच्या घराची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे.

आलाणे गाव शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे व विहिरींचे नुकसान झाले. चिमठाणे येथील शेतकरी उखा धना कोळी यांच्या गट क्रमांक १३/२/बीमध्ये असलेल्या शेतात पाणी शिरून कपाशी, सुबाभूळ आदी पिकांचे नुकसान झाले.

बुधवारी (ता. १७) सकाळी सातपर्यंत

महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस मिलिमीटर (कंसात आजपर्यंत झालेला एकूण पाऊस)शिंदखेडा मंडळ : ६४ (३१९)नरडाणा मंडळ : १५ (२५२)खलाणे मंडळ : ६१ (३४१)चिमठाणे मंडळ : ९५ (३८०)वर्शी मंडळ : ३४ (२८०)

बेटावद मंडळ : २२ (२१७)

विरदेल मंडळ : ०५ (०५३)दोंडाईचा मंडळ : ३० (१५६)

विखरण मंडळ : १६० (४७१)

शेवाडे मंडळ : ११८ (४०१)

----------------------------

एकूण : ६०४ २,८७०

Damage to the car due to the collapse of the wall of the mud house, damage to the cotton crop due to water in the field of farmer Pradeep Singh Girase.
Dhule News: ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम कागदावरच! सूचना नसल्यामुळे शाळा द्विधा मनःस्थितीत; काहींचा कृतिशील पुढाकार

तामसवाडी शिवारात मुसळधारेने नुकसान

कापडणे : परिसरात मंगळवारी (ता. १६) मंगळवारी सायंकाळी साडेसहापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. आठपर्यंत धो धो कोसळला. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. मातीच्या भिंती कोसळल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरातील नगाव, तिसगाव, ढंढाणे, वडेल, रामनगर, देवभाने, सरवड, सोनगीर, धनूर, तामसवाडी, हेंकळवाडी, कौठळ, न्याहळोद, जापी, बिलाडी व धमाणे शिवारात मुसळधार पाऊस झाला. गेल्या तीन आठवड्यांत हा तिसरा मुसळधार पाऊस आहे. पहिल्या मुसळधार पावसात बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बांध फुटले. शेतीचे नुकसान झाले. या पावसाने आगात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे युवा शेतकरी राजेश भामरे यांनी सांगितले.

Damage to the car due to the collapse of the wall of the mud house, damage to the cotton crop due to water in the field of farmer Pradeep Singh Girase.
Dhule Monsoon Update : लामकानीत 85 मिलिमीटर पाऊस! घरांची पडझड, शेतशिवाराचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com