Dhule Fraud Crime : वीज ठेकेदार हरिश जंगले कोठडीत; भुसावळहून अटक

Dhule Crime : दहा कोटीहून अधिक रकमेचा गंडा घालणारा वीज कंपनीचा ठेकेदार हरिश जंगले सध्या येथील पोलिस कोठडीत आहे.
Harish jangle
Harish jangleesakal
Updated on

Dhule Fraud Crime : जिल्ह्यासह ठिकठिकाणच्या असंख्य नागरिकांना गुंतवणुकीबाबत आमिष दाखवून सुमारे दहा कोटीहून अधिक रकमेचा गंडा घालणारा वीज कंपनीचा ठेकेदार हरिश जंगले सध्या येथील पोलिस कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत बुधवारी (ता. १२) संपत आहे. त्याचा लॅपटाप जप्त झाल्याने तपासाला दिशा मिळणार आहे. शिवाय तपासात तो ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्याचे सांगत आहे. ( Electricity contractor Harish jangle Arrested from Bhusawal )

मात्र, फसवणुकीतील गुंतवणुकदार त्यांच्या कष्टाच्या रकमा मिळण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश भुसर, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवळे, सहायक उपनिरीक्षक शेख, ठाकरे, हवालदार प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार यांनी संशयित हरिष जंगले यास भुसावळ (जि. जळगाव) येथून पाच दिवसांपूर्वी अटक केली होती.

शहर पोलिसांत गुन्हा

शहर पोलिस ठाण्यात २२ सप्टेंबर २०२३ ला गुन्हा दाखल झाला. त्यानुसार संशयित पती-पत्नी, सासू-सासरे, भाऊ, शालकावर ५८ लाख ७५ हजारांच्या अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ए. एम. पाटील यांच्या फिर्यादीनुसार २२ ऑगस्ट २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ५८ लाख ७५ हजार रुपयांचा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अपहार झाला.

यात संशयित वीज कंपनीचा एक कंत्राटदार हरीश रमेश जंगले, शीतल हरीश जंगले, जाज्वल्य हरीश जंगले (वय ३२, शिवाजीनगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे, ह. मु. भुसावळ, जि. जळगाव), मधुकर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), नीलिमा मधुकर पाटील, जितेश मधुकर पाटील (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), मनोज रमेश जंगले (प्लॉ. नं. ८, गणेश कॉलनी, भुसावळ, जि. जळगाव) या सात जणांनी गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन केला.

Harish jangle
Dhule Crime News : लूट प्रकरणातील साडेतेरा लाख हस्तगत; टोळीतील तिघे जेरबंद

त्यांनी फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करायला लावले. तुम्हाला भरपूर लाभांश मिळवून देईल, असे खोटे आमिष दाखविले. या आधारे घेतलेले पैसे फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत न गुंतविता परस्पर ५८ लाख ७५ हजारांचा अपहार केला व फसवणूक केली.

काय आहे प्रकरण?

संशयित हरीश जंगले याने ओळखी व जनसंपर्काचा फायदा घेत, तसेच पत्नीच्या मदतीने काही ओळखीतील व्यक्तींना पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्याने काही जणांना लाभांशासह मुद्दल परत केली. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. साइड बिझनेस करणारा कंत्राटदार हरीश जंगले याला अनेकांनी धनादेशाद्वारे, तर काहींनी धनादेश व उर्वरित रक्कम रोख दिली, तर काहींनी ऑनलाइन पैसे दिले.

यात कुणी पाच लाख, १० लाख, १५, २५, ४०, ५० लाखांपर्यंत रक्कम गुंतवणुकीसाठी दिली. अशा गुंतवणूकीत वीज कंपनीचे अनेक अधिकारी, कर्मचारी, काही पोलिस व विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व सर्वसाधारण व्यक्तींचा समावेश आहे.

जंगलेची व्यवसाय वृध्दी

एकमेकांच्या ओळखीच्या लाभातून जंगले याने व्यवसाय वाढविला. काही व्यक्तींनी पैसे परताव्याचा तगादा लावल्यानंतर हरीश जंगले याने संबंधितांना धनादेश दिले. ते नंतर बाउन्स झाले. या प्रकारानंतर हरीश जंगले याने फोन उचलणे बंद केले. त्याऐवजी त्याचा भाऊ मनोज जंगले हा गुंतवणूकदारांना हाताळू लागला. तरीही पैशांबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यातून ५९ लाखांचा अपहार व फसवणुकीचा गुन्हा येथे दाखल झाला. या प्रकरणात सरासरी दहा कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालण्यात आल्याची शक्यता गुंतवणूकदारांकडून वर्तविली जात आहे.

Harish jangle
Dhule Crime News : 2 बियाणे विक्रेत्यांवर गुन्हा; जादा दराने विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.