Dhule Employment Fair : जिल्ह्यात 24 अन्‌ 30 ला रोजगार मेळावा; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

Job Fair : युवक- युवतींना शासकीय व खासगी आस्थापना, उद्योजकांकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे.
Job Fair
Job Fairesakal
Updated on

Dhule Job Fair : युवक- युवतींना शासकीय व खासगी आस्थापना, उद्योजकांकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत उमेदवारांना औद्योगिक आणि बिगरऔद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण, गरजू युवकांना रोजगाराची संधी, तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात २४ व ३० सप्टेंबरला रोजगार मेळावा होणार आहे. (Employment fair in district on 24th and 30th )

मंगळवारचे नियोजन

नियोजित स्थळी सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेळावा होणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी सांगितले. ते म्हणाले, की या योजनेचा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून प्रथम टप्प्यात शासकीय- निमशासकीय आस्थापनांमध्ये प्राधान्याने उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, शासनाच्या मूळ उद्देशाप्रमाणे योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी खासगी आस्थापना, उद्योगांचा सहभाग मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे.

या अनुषंगाने योजनेचा लाभ अधिकाअधिक प्रशिक्षणार्थ्यांना व्हावा व जास्तीत जास्त खासगी आस्थापना, उद्योग या योजनेत सहभागी व्हावेत, या उद्देशाने मंगळवारी (ता. २४) औद्यागिक प्रशिक्षण संस्था (जुना आग्रा रोड, देवपूर, धुळे), औद्यागिक प्रशिक्षण संस्था (चोपडा रोड, कळमसरे, ता. शिरपूर), औद्यागिक प्रशिक्षण संस्था (कुमरेत रोड, शिंदखेडा), औद्यागिक प्रशिक्षण संस्था (नवापूर रोड, शासकीय ग्रामीण रुग्णालय शेजारी, पिंपळनेर, ता. साक्री) येथे रोजगार मेळावा होईल. (latest maratahi news)

Job Fair
Job Fair : नंदुरबार येथे 24 ला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी

३० सप्टेंबरचे नियोजन

३० सप्टेंबरला अहिंसा औद्यागिक प्रशिक्षण संस्था (दोंडाईचा शिवार, धुळे रोड, दोंडाईचा), औद्यागिक प्रशिक्षण संस्था (जुना आग्रा रोड, देवपूर, धुळे), श्रीमती एच. आर. पटेल कला महिला कॉलेज (शिरपूर), धुळे व साक्री शासकीय तांत्रिक विद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर यापूर्वी नोंदणी केली असेल, तर वेबपोर्टलवरील जॉब सिकर लॉगिनमध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरून शिक्षण, अनुभव, बँक खाते तपशील आदी सर्व माहिती अद्ययावत करावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे (दूरध्वनी ः ०२५६२-२९५३४१) येथे संपर्क साधावा. रोजगार मेळाव्यांचा अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वाकुडे यांनी केले.

युवकांना सहभागाचे आवाहन

नोंदणी झाल्यावर मोबाईल क्रमांकावर उमेदवारांस नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो भरून वेबपोर्टलवरील जॉबसिकर लॉगीनमध्ये रजिष्टर आयडी आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून रोजगार मेळावा, या यादीतील धुळे जिल्हा निवडावा. त्यातील रोजगार मेळाव्याची माहिती घेऊन नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती पाहून ॲप्लायवर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाइन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण करावा, असे आवाहन वाकुडे यांनी केले.

Job Fair
Dhule Job Fair : 7 डिसेंबरला धुळ्यात रोजगार मेळावा; कंपन्यांमधील 640 जागांच्या भरतीसाठी मुलाखती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.