Dhule News : मोठ्या प्रमाणावर औषधसाठा व विक्री करणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांकडे तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही जिल्ह्यांत १ ते १४ ऑगस्टदरम्यान चौकशी अभियान राबविण्यात येत आहे. (Examination of private doctors on drug stock issue Campaign till August 14)
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अनेक झोपडपट्टी व ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पुरविणारे खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देत असतात. मात्र, औषध आणि सौंदर्यप्रसाधनाच्या नियमाच्या अनुसूची ‘क’नुसार डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा करणे व त्याची विक्री करण्यास परवानगी नाही.
त्यामुळे खासगी डॉक्टर या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने पत्राद्वारे २४ जुलैला अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने १ ते १४ ऑगस्टदरम्यान राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार प्रत्येक औषध निरीक्षकाला किमान दहा डॉक्टरांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या तपासाबाबतचा अहवाल व त्याअनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १६ ऑगस्टपर्यंत मुख्य कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. औषध आणि सौंदर्यप्रसाधनाच्या नियमाच्या अनुसूची ‘क’अनुसार डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आणि विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)
विनाचिठ्ठी औषधे नको
ग्रामीण व झोपडपट्टी भागात डॉक्टर अल्पदरात औषध विक्री करत असल्याने गरिबांना त्यांच्याकडील उपचार परवडतो. मात्र, अशा डॉक्टरांवर कारवाई केल्यास गरीब रुग्णांना मेडिकल स्टोअर्समधून महागडी औषधे खरेदी करावी लागतील.
त्यामुळे औषध विक्रेत्यांचाच अधिक फायदा होईल. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी विनासबस्क्रिप्शन (विनाचिठ्ठी) औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई केली पाहिजे, असे काही खासगी डॉक्टर म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.