Jal Jeevan Mission : केंद्राच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत १३७ योजनांची कामे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात झाली आहेत. तसेच ९५ योजनांची कामे ५० टक्क्यांवर, ५५ योजनांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी, ३२ योजनांची कामे कासवगतीने होत असल्यामुळे २५ टक्केदेखील काम झालेले नाही. शिवाय पाच योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, तर २१ योजनांची कामे तांत्रिक कारणांमुळे थांबविण्यात आली आहेत. यात मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याची मुदत होती. (Extension of work till September to fulfill objective of Jal Jeevan Mission in district )