Dhule Fake Fertilizer Case : ग्रीनफील्ड कंपनीचा परवाना निलंबित; बनावट खत प्रकरणी कृषी संचालकांची कारवाई

Kurban Tadvi, Arun Tayde and the police during the inspection during the recent operation in the case of fake fertilizer stock in the warehouse of MIDC.
Kurban Tadvi, Arun Tayde and the police during the inspection during the recent operation in the case of fake fertilizer stock in the warehouse of MIDC.esakal
Updated on

Dhule Fake Fertilizer Case : बनावट मिश्र खताद्वारे शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील ग्रीनफील्ड ॲग्रीकेम कंपनीचा परवाना गुणवत्ता नियंत्रणचे पुणेस्थित कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी तत्काळ निलंबित केला आहे.

राज्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या खताचे उत्पादन व विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले आहेत. (Dhule Fake Fertilizer Case License of greenfield company suspended news )

या प्रकरणी शेतकरीहितासाठी ‘सकाळ’ने विशेष मालिकेद्वारे या गैरउद्योगाचा पर्दाफाश केल्याने कृषी यंत्रणेला तत्काळ कारवाईची पावले उचलावी लागली आहेत. येथील ‘एमआयडीसी’तील दोन गुदामात १३ लाखांवर बनावट मिश्र खताचा साठा ८ जुलैला कृषी पथकाला आढळला.

या प्रकरणी सुरत (गुजरात) येथील फार्म सन्स फर्टिकेम कंपनी, तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील ग्रीनफील्ड ॲग्रीकेम कंपनी आणि या कंपनीचा येथील मुख्य वितरक व भूमी क्रॉप सायन्सचा चालक नरेंद्र चौधरी (रा. धुळे) याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

भेसळ झाल्याचे सिद्ध

कारवाईवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी आणि खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी वादग्रस्त गुदामातून मिश्र खताचे चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kurban Tadvi, Arun Tayde and the police during the inspection during the recent operation in the case of fake fertilizer stock in the warehouse of MIDC.
Dhule Fake Fertilizer Case : धूळफेकीसह फसवणुकीचा कळस! फॉस्पो जिप्समची तब्बल बाराशे रुपयांवर विक्री

ते अप्रमाणित आले आहेत. त्यामुळे ग्रीनफील्ड कंपनीचे १८ः१८ः१० मिश्रखत बनावट असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

या मिश्र खतात फॉस्पो जिप्समची भेसळ झाल्याचा संशय कारवाईवेळी कृषी यंत्रणेने व्यक्त केला होता. तो खरा ठरला. अधिकतर ग्रीनफिल्ड कंपनीच्या कृषी राजा ब्रॅण्डमध्ये हा प्रकार आढळला आहे. ते लक्षात घेत कृषी संचालक तथा नोंदणी प्राधिकारी पाटील यांनी जीवनावश्‍यक कायद्यासंबंधी तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रीनफिल्ड कंपनीचा परवाना निलंबित केला आहे.

क्ले ग्रॅन्युएल्स खरेदीतून ते कृषी राजा व कृषी सम्राट हे नाव छपाई केलेल्या खत उत्पादक ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि.ने ५० किलो क्षमतेच्या बॅगांमध्ये भरल्याचे तपासणीतून समोर आले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी या कंपनीचे शिल्लक खत खरेदी करू नये, तसेच विक्रीही होऊ नये यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे निर्देश दिले गेले आहेत.

Kurban Tadvi, Arun Tayde and the police during the inspection during the recent operation in the case of fake fertilizer stock in the warehouse of MIDC.
Dhule Fake Fertilizer Case : ग्रीनफिल्ड कंपनीचे नमुने अप्रमाणित : कृषी सहसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.