Dhule News : धुळ्याच्या पोलिस दलात भूकंप घडविणाऱ्या जीएसटी लूट प्रकरणात सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत खाकीतील बदमाशांनाही अद्दल घडविली. बनावट जीएसटीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात पंजाबच्या व्यापाऱ्यालाही लुटले गेले होते.
या लुटीतील एक लाख ३० हजारांपैकी एक लाख २० हजार रुपयांची रक्कम पंजाबच्या व्यापाऱ्यांना श्री. रेड्डी यांच्यामुळे परत मिळाली. (Dhule Fake GST case stolen amount handed over to trader)
४ जानेवारी २०२४ ला विकास कॉलनी पटियाला (पंजाब) येथील कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा (वय ५९) या व्यापाऱ्याने बनावट जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची तक्रार धुळ्यातील आझादनगर पोलिसांत दिली होती.
१७ ऑक्टोबर २०२३ ला बाजवा यांच्या कंपनीतील एसी भरलेला (पीबी ११, सीझेड ०७५६) ट्रक पटियाला येथून पुण्याकडे जात असताना धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर लाल दिव्याच्या सुमो गाडीतील खाकीतील तिघा-चौघांनी अडविला.
जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून वाहनातील मालाच्या कागदपत्रांची तपासणी केली. कागदपत्रात चुका असल्याचे दर्शवून ट्रकचालकामार्फत बाजवा यांच्याशी फोनवरून बोलणे करून त्यांना जीएसटीच्या मोठ्या दंडाची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ३० हजारांची रक्कम ऑनलाइन फिर्यादीकडून घेण्यात आली. (latest marathi news)
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, तसेच एपीआय संदीप पाटील, एपीआय उमेश बोरसे, कबीर शेख, किरण कोठावदे, महेंद्र भदाणे, नीलेश धाकड, मकसूद पठाण यांनी गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने सखोल तपास करत आरोपींना जेरबंद केले.
स्वाती रोशन पाटील (रा. नाशिक), एएसआय बिपीन आनंदा पाटील, इम्रान इसाख शेख, बबलू ऊर्फ विनय सुरेश बागूल या चौघांना अटक केली.
पोलिस कोठडीदरम्यान सहाय्यक पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी आरोपी बबलू ऊर्फ विनय (रा. पिंजारी चाळ, धुळे) याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस करून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील फसवणूक रक्कम एक लाख ३० हजारांपैकी एक लाख २० हजार रुपये हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते कश्मीरसिंग बाजवा यांना ही रक्कम देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.