E-Peek Pahani : ई-पीक पाहणी नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त; शासकीय योजनांसह विमा योजनेपासून वंचित राहणार

E-Peek Pahani : मोबाईलद्वारे ऑनलाइन ई-पीक पाहणी लागत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र असून, शेतकरीवर्गात नाराजी आहे.
E-Peek Pahani
E-Peek Pahani esakal
Updated on

निमगूळ : निमगूळ गावासह कुरुकवाडे, रामी, पथारे, धावडे, विखरण या गावात मोबाईलद्वारे ऑनलाइन ई-पीक पाहणी लागत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र असून, शेतकरीवर्गात नाराजी आहे. ई-पीक पाहणी त्वरित लावण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या नियमानुसार रविवार (ता. १५)पर्यंत ई-पीक पाहणी न लागल्यास शेतकरीवर्गाचे नुकसान होणार आहे. निमगूळसह गावात सिटी सर्व्हेनुसार दप्तर सर्व्हे आहे. मात्र ई-पीक पाहणीचे ॲप हे गटनुसार सर्व्हे करते. (farmers are worried due to deprived of insurance schemes along with e crop inspection)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.