Dhule News : कृषी विभागाच्या योजनांपासून बळीराजा‌ ‘वंचित’! रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांची फरपट

Dhule : शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकरी हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. परंतु, कृषी विभागात पुरेसे कर्मचारी नसतील तर सुविधा देणे अवघड होते.
agriculture department
agriculture departmentesakal
Updated on

Dhule News : शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकरी हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. परंतु, कृषी विभागात पुरेसे कर्मचारी नसतील तर सुविधा देणे अवघड होते. अशावेळी ‘बळीराजा’ला समस्यांचे गाठोडे घेऊन तालुका कृषी कार्यालयाच्या दारी वारी करणे क्रमप्राप्त ठरते. साक्री तालुका कृषी विभागात तब्बल २०१५ पासून काही पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, अनुरेखक, लिपिक, वाहनचालक, शिपाईच काय चक्क पहारेकऱ्यांचे पद देखील रिक्त आहे. (farmers deprived of agriculture department schemes )

तालुका कृषी कार्यालयात ८४ पैकी २७ पदांची वानवा आहे. रिक्त पदे तत्काळ भरत नेहमी विविध समस्यांनी त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. तालुका कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी पद असून, दुसरे कृषी अधिकारी पद आहे. साक्री, दहिवेल, पिंपळनेर व निजामपूर अशी चार कृषी मंडळे आहेत. त्यात चार मंडळ कृषी अधिकाऱ्यांची पदे असून, निजामपूर येथील मंडळ कृषी अधिकारी पद रिक्त आहे.

कृषी सहाय्यकांची ४९ पदे असून, नऊ पदे रिक्त आहेत. अनुरेखकाची सहा पदे असून, सहाही पदे रिक्त आहेत. लिपिकची चार पदे असताना तीन पदे रिक्त आहेत. वाहन चालकाचे केवळ एक पद असताना तेही रिक्त आहे. शिपाई सहाही पदे रिक्त आहेत. पहारेकराचे एकमेव पदही भरलेले नाही. चक्क २०१५ पासून साक्री मुख्य कार्यालयातील अनुरेखकाचे पद रिक्त आहे.

कृषी विभागाच्या शेकडो योजना

कृषी विभागाच्या सुमारे १२२ पेक्षा अधिक योजना आहेत. अशावेळी सर्वच योजना राबविल्या जातात का, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यात प्रामुख्याने फळबाग लागवड, कांदाचाळ ,मागेल त्याला शेततळे, बंदीस्त गृह, सामूहिक शेततळी, शेडनेट, शेती अवजारे वाटप, पीक प्रात्यक्षिक, ट्रॅक्टर अनुदान योजना, अन्नसुरक्षेसारख्या शेकडो योजना आहेत. विविध योजना राबविणारी यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. (latest marathi news)

agriculture department
Dhule News : पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुंडांच्या ठेचल्या नांग्या; गधडदेवच्या वनजमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त

२२ मे २००९ नुसार सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदे मंजूर असताना अनेक वर्षांपासून ती रिक्त असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कार्यभार असल्याने कामे कासवगतीने होतात. साक्री तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात दुसरा मोठा तालुका आहे. अडिचशेपेक्षा अधिक गावे आणि पाडे आहेत. कृषी विस्ताराच्या दृष्टीने राज्यात अनेक घडामोडीत तालुक्याचा सहभाग हमखास असतोच. कृषि विभागाची पदे रिक्त असल्याने बळीराजाची नेहमीच तारांबळ उडत असते.

कृषी क्षेत्र दृष्टिक्षेपात...

साक्री तालुक्यात २२७ गावे व काही पाडे आहेत. भौगोलिक क्षेत्र दोन लाख ४४ हजार २१० हेक्टर आहे. त्यात ७३ हजार ६७७ हेक्टर वनक्षेत्र आहे. २८२७ हेक्टर बिगरशेती उपयोगिता क्षेत्र आहे. पडीक जमिन, मशागती अयोग्य १८ हजार १७८ हेक्टर, कायम व चराई कुरण १६७७ हेक्टर, लागवडीस योग्य एक लाख ४५ हजार ४५५ हेक्टर. वहितीखालील क्षेत्र : हलकी जमीन ४५,५४५ हेक्टर, मध्यम जमिन ६८,३४६ हेक्टर, तर मध्यम-भारी जमिन ३० हजार ५६४ हेक्टर क्षेत्र आहे.

''साक्री तालुक्यात ‘पेसा’अंतर्गत ८० पेक्षा अधिक गावे येतात. अशा ठिकाणी कृषी विभागाच्या अनेक अडचणी आहेत. रिक्त पदे तत्काळ भरावीत, ही मागणी सातत्याने लावून धरली आहे. सुधारित आकृतिबंधानुसार नवीन पदे मंजूर असताना शासन चालढकल करत वेळ मारुन नेत आहे. रिक्त पदांमुळे योजना मंजूर असूनही शेतकऱ्यांना वंचित रहावे लागते.''- गिरीश नेरकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

agriculture department
Dhule News : 7 कोटीच्या गार्डनमध्ये ठेकेदाराचे वाहनतळ! शिवसेना UBTने मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.