Dhule News : धामणगावचे पिता-पुत्र बोरी नदीत वाहून गेले; पुलावरून निसटले

Dhule News : धामणगाव (ता. धुळे) येथे बोरी नदीच्या पात्रात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी दोन जण वाहून गेले.
drowned
drowned ESakal
Updated on

धुळे : धामणगाव (ता. धुळे) येथे बोरी नदीच्या पात्रात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी दोन जण वाहून गेले. दिनकर लाला पाटील आणि मिलिंद दिनकर पाटील, अशी त्यांची नावे आहेत. ही घटना दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. मिलिंद पाटील याचा मृतदेह शनिवारी (ता. १२) सकाळी सापडला, तर दिनकर पाटील यांचा शोध सुरू आहे. बोरी नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्यामुळे ही घटना घडली. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. (Father and son of Dhamangaon got swept away in Bori river and escaped from bridge )

धामणगावजवळ बोरी नदी वाहते. या नदीवर कमी उंचीचा पूल आहे. त्याच्या पुष्ठभागाची दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. अशात शुक्रवारी सकाळी दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा मिलिंद शेतीची कामे आवरून दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरी निघाले. पुलावरून दिनकर पाटील यांचा पाय घसरला आणि ते नदीपात्रात पडले.

कंबरेपेक्षा अधिक उंचीचे पाणी असल्याने दिनकर पाटील काही वेळात नदीच्या मध्यभागी पोचले. त्या वेळी त्यांचा मुलगा मिलिंद याने वडिलांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. परंतु पाण्याच्या प्रवाहात त्यांचा टीकाव लागला नाही. दोघे जण वाहून गेले. घटनेनंतर आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या पथकाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शनिवारी सकाळी मिलिंद याचा मृतदेह आढळला. दिनकर पाटील यांचा शोध सुरू आहे.

drowned
Dhule News : अल्पवयीन मुलीसह तरूणी गायब; साळवेत एकाच रात्रीची घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.