Dhule News : देवरे महाविद्यालयाच्या प्रांगणात बहरली वनराई! म्हसदी येथे विद्यार्थ्यांना अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींची ओळख

Dhule News : प्रत्येक वृक्षाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून नावाची पाटी लावली आहे. यातून विद्यार्थ्यांना अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींची ओळख होत आहे. झाडांना डिजिटल टॅग लावण्यात आले आहेत.
Annasaheb R. D. A blossoming tree in the Devere College area.
Annasaheb R. D. A blossoming tree in the Devere College area.esakal
Updated on

म्हसदी : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड मोहिमेस बळ म्हणून येथील वृक्षप्रेमी शैक्षणिक संस्था वृक्षसंवर्धनासाठी वेगळेपण जपत आहे. आदिशक्ती धनदाईमाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक संकुलाच्या परिसरात विविध वृक्ष, फुलझाडी‌, वेली, औषधी वनस्पती लावून परिसर निसर्गरम्य केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वृक्षाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून नावाची पाटी लावली आहे. यातून विद्यार्थ्यांना अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींची ओळख होत आहे. झाडांना डिजिटल टॅग लावण्यात आले आहेत. (Dhule Forest blossomed in premises of Deore College)

महाविद्यालयात प्रत्येक विषयाचा स्वतंत्र विभाग आहे. महाविद्यालयात केवळ शिक्षण नव्हे तर वर्षभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. वृक्षलागवड, संवर्धनासाठी वनस्पतिशास्त्र, भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे नियोजन केले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार देवरे, उपाध्यक्ष राजाराम देवरे, सचिव डॉ. संजीवनी देवरे, खजिनदार डॉ. सुजाता सोनवणे, डॉ. भारती देवरे,

इंजि. नंदकिशोर देवरे, इंजि. कुणाल देवरे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, वनस्पतिशास्त्राचे प्रा. डॉ. विशाल शिंदे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वृक्षसंवर्धनासाठी परिश्रम घेतात. वृक्ष, औषधी वनस्पती, फुलझाडांच्या जोपासनेसाठी विशेषतः अरुण पवार, घनश्याम देवरे, राजेंद्र देवरे, डॉ. हृषीकेश चित्तम, प्रवीण मोरे, जितेंद्र देवरे, रत्नाकर जाधव, संजय बहिरम, बापू मोहिते, शरद विसपुते, रामदास शेवाळे व विद्यार्थी परिश्रम घेतात. (latest marathi news)

Annasaheb R. D. A blossoming tree in the Devere College area.
Dhule Political: भाजपच्या राजवटीतील मागणी आता काँग्रेसच्या खासदारांकडे! डॉ. बच्छावांकडे धुळे-पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

सुगंधी, औषधी वनस्पती उद्यान

उद्यानात विविध प्रकारची ८० सुगंधी, औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे. करवंद, सागरगोटा, वेखंड, लाजाळू, लवंग, पानओवा, वैजयंती, तुळस, कापूर, सिमारुबा, मेंदी, एलोवेरा, गुगुळ, चित्रक रिठा, आवळा, ब्राह्मी, कांडवेल, सर्पगंधा, पुदिना, रोशा गवत, जावा, सित्रोनेला, खिरणी, भद्रराक्ष, फणस, लक्ष्मणफळ, रिठा आदी ८० सुगंधी, औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जात आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात चार कमळ तलाव आहे. शिवाय डास निर्मूलनासाठी गप्पी मासे सोडले जातात. महाविद्यालयात अकराशे फुलझाडी व अडीचशेपेक्षा अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात सपुष्प वनस्पती ८८९ असून, अपुष्प वनस्पती ४५ अशा ९३४ वनस्पतींचे संवर्धन केले जात आहे.

विविध फुलझाडांसह गावठी, जंगली खजूर, तुळस, रानतुळस, गोकर्ण, वाघनखी, केकताळ, कर्दळी, कढीपत्ता, शतावरी, सरू, रुद्राक्ष, शिकामुद्रिका, कृष्णकमळ, गुलतारी आदी दुर्मिळ, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. शिवाय लिंब, चिंच, वड, पिंपळ, बांबू, बेल, चंदन, अर्जुन साल यांसारख्या महत्त्वाच्या अनेक झाडांची नैसर्गिक पद्धतीची वनराई उभी आहे. शिवाय नुकतीच फणसाची रोपे लावण्यात आली आहेत.

"महाविद्यालयाच्या प्रांगणात उभी असलेली वनराई नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहे. विविध प्रकारच्या झाडांच्या संवर्धनासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असणार आहे." -डॉ. संजयकुमार देवरे, अध्यक्ष, (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (ता. साक्री, जि. धुळे)

Annasaheb R. D. A blossoming tree in the Devere College area.
Dhule District Court: जिल्हा न्यायालय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता! पालकमंत्री महाजनांसह वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.