Dhule Tree Cutting : अवैध वृक्षतोडीविरोधात कारवाई का नाही? शहादा तालुक्यातील वनप्रेमींचा प्रशासनाला सवाल

Tree Cutting : शहादा तालुक्यातील बहुतांश गावात लिंब, चिंच, बाभुळ यासह सर्वच हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड होत आहे.
Scene of illegal felling of trees and being transported by tempo.
Scene of illegal felling of trees and being transported by tempo.esakal
Updated on

Dhule Tree Cutting : शहादा तालुक्यातील बहुतांश गावात लिंब, चिंच, बाभुळ यासह सर्वच हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड होत आहे. अवैध वृक्षतोडीने कहर केला आहे. यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश नाही. वनविभागासह प्रशासन सुस्त असून, याकडे वनविभागाचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपले जातात की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ( administration why there is no action against illegal felling of trees )

शहादा तालुक्यात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फोफावले आहे. दिवसागणिक कत्तल केलेली वृक्ष घेवून जाणारी वाहने हमखास नागरिकांच्या नजरेस दिवसागणिक पडत आहेत. वृक्ष लागवडीपेक्षा अधिक होणारी वृक्षतोड पर्यावरणाला घातक ठरणारी आहे. याचा प्रत्यय पर्यावरणाचा दुष्परिणामांनी दिसत आहे. या अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वन विभागाने कार्यवाही करण्याची नितांत गरज असल्याची मागणी नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

शहादा तालुक्यात सुरु असलेली बांधकामे, वीटभट्टी यासाठी सर्रासपणे वृक्षतोड सुरु असून, बांधकाम क्षेत्रातील इमारतींना दरवाजे चौकट व वीटभट्टीला डेरेदार वृक्ष आदी कामासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. वृक्षतोडमुळे ऑक्सिजनचा समतोल ही बिघडल्यामुळे तसेच, दिवसेंदिवस वाढणारी तीव्र उष्णता यामुळे अनेक लोकांना दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.

शहादा तालुक्यात माळरानात, नदीकाठावर लिंब, चिंच, बाभुळ यासह उंच डेरेदार हिरवे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, विनापरवाना हिरव्या झाडांची कत्तल करण्याचा धडाकाच लावला आहे. विविध हिरव्यागार नटलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याने सारे माळरान उजाड होत आहे. शहरासह तालुक्यातून रस्त्यावरुन भर दिवसा लाकडांची अवैध वाहतूक होते. पहाटे व दुपारी सायंकाळी शांततेचा फायदा घेत शहर व ग्रामीण भागातून चोरट्या मार्गाने वाहतूक होतांना दिसते. (latest marathi news)

Scene of illegal felling of trees and being transported by tempo.
Tree Cutting : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात अकरा हजार झाडांवर कुऱ्हाड

तोडलेल्या झाडाची लाकडे ट्रॅक्टर, चारचाकी वाहनाने शहरातील सॉ मिलवर व वीटभट्टी येथे आणली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रशासनाने याप्रश्‍नी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. शहादा तालुक्यात अवैध वृक्ष तोडी करणाऱ्या टोळया कार्यरत आहेत. अनेक लाकडांचे व्यापारी आहेत. इलेक्ट्रीक हत्याराने लाकडांची कटाई होतांना दिसते. वनविभागासह प्रशासनाने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

वृक्षसंवर्धनाचा संदेश नावालाच

तालुक्यात शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध वृक्षांची लागवड केली जाते. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला जातो. त्यावर शासन लाखो रुपये खर्च करते. दुसरीकडे मात्र सर्रास हिरव्या डेरेदार झाडांची अवैध वृक्षतोड होताना दिसते. मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? जे सामान्य नागरिकांच्या नजरेस पडते ते प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीवर आळा बसवावा. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखावा, अशी मागणी शहादा तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.

''शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरात दिवसाढवळ्या सर्रासपणे हिरव्यागार, डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे. वनविभाग आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देवूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे संबंधित प्रशासनाला यातून काही आर्थिक फायदा होतो का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. सदर अवैध वृक्षतोड थांबवावी व अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.''- चंद्रकांत रायसिंग, वनप्रेमी

Scene of illegal felling of trees and being transported by tempo.
Dhule Tree Cutting Case : झाडांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार! अंतिम निर्णयासाठी फाइल आयुक्तांकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.