Dhule News : शहरातील मच्छी बाजारात संशयित महिलेकडून ताब्यात घेतलेले बाळ तळोजा (जि. रायगड) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे पालक असल्याचा दावा करणाऱ्या महिला व पुरुषांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. संशयित महिला मद्याच्या अमलाखाली असून, वेगवेगळी उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरातील गजबजलेल्या मच्छी बाजारात संशयित महिला मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी (ता. ३०) दुपारी फिरत होती. तिच्याजवळ लहान बाळ होते. संशयित महिलेस ओळखणाऱ्यांना ती एकटी राहत असल्याचे माहीत होते. त्यामुळे तिच्याकडे बाळ पाहून त्यांना संशय आला. त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली.
निरीक्षक के. के. पाटील, दामिनी पथकप्रमुख उपनिरीक्षक छाया पाटील, हवालदार रोशनी पाटील, नूतन सोनवणे, अनिता पावरा, चालक प्रभाकर भिल यांनी घटनास्थळी जाऊन तिला ताब्यात घेतले.
पालकांचा दावा
संशयित महिलेस पोलिस ठाण्यात आणल्यानंतर उपनिरीक्षक पाटील यांनी बाळाची रुग्णालयात नेऊन तपासणी केली. महिला मद्यधुंद असल्यामुळे काहीच माहिती देत नव्हती. त्यामुळे बाळाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. पोलिसांनी आपल्या विभागासह विविध समाज माध्यमांवरील ग्रुपवर बाळाची छायाचित्रे व्हायरल केली. (latest marathi news)
सायंकाळी तळोजा येथील दांपत्याने ते बाळ त्यांचे असून, सुमारे दीड महिन्यापासून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी खात्री पटविण्यासाठी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. तळोजा येथील स्थानिक पोलिस ठाण्यात बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
तळोजा ते शिरपूर प्रवास
दीड महिन्यापूर्वी तळोजा येथून बेपत्ता झालेले बाळ शिरपूरपर्यंत कसे पोचले, हे मोठे गूढ आहे. संशयित महिलेने आपण शिंदखेडा येथून बाळ आणल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणीत बाळाचे वय सुमारे आठ ते नऊ महिने असल्याचे दिसून आले. ते कोणाच्या माध्यमातून शिरपूरपर्यंत आले हे रहस्य कायम असून, बाळाच्या पालकांकडूनच ते उलगडण्याची शक्यता आहे.
शिशूगृहामध्ये रवानगी
दीड महिन्यापासून बाळाची हेळसांड सुरू होती. त्यामुळे उपनिरीक्षक श्रीमती पाटील व सहकाऱ्यांनी त्याची स्वच्छता केली. त्याच्यासाठी नवे कपडे, गादी, दुधाची सोय केली. पोलिस ठाण्यात मायेची ऊब मिळताच बाळ गाढ झोपी गेले. त्याची शिशूगृहात रवानगी करणार असून, पालकांची डीएनए तपासणी करून ते जुळल्यानंतरच बाळाच्या ताब्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.