Dhule Fraud Crime : खंडाळा (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथील वी. के. डिस्टिलरीज प्रा. लि. कंपनीच्या देशी दारू सुगंधी संत्राच्या नावाने नेर (ता. धुळे) एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बनावट मद्य तयार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राज्य उत्पादक शुल्क विभाग (धुळे) पथकाने संशयितांवर दहा मेस गुन्ह्याची नोंद केली होती. (Crime against three accused of cheating through fake labels of country liquor)
मात्र, अधिक तपासात कंपनीचे बनावट लेबल तयार करून हा गैरव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. वी. के. डिस्टिलरीज प्रा. लि. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर धनेश अडवानी (रा. संसरी रोड, देवळाली कॅम्प, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार जीनकुमार छोटूलाल सेन (रा. पराआसिद, ता. असिंद, जि. भिलवाडा, राजस्थान व ह. मु. पवन शर्मा यांच्या घरी, धुळे), पवन शर्मा (रा. धुळे) व शेतमालक रवींद्र चिंतामण धोबी (रा. महालकाली शिवार, नेर, ता. धुळे) हे वी. के. डिस्टिलरीज प्रा. लि. कंपनीचे बनावट लेबल तयार करून ते खरे असल्याचे भासवीत बनावट मद्य तयार करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या कारवाईत १० मेस रात्री बारा ते पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास आढळले.
कारवाईत वी. के. डिस्टिलरीज प्रा. लि. खंडाळा (ता. श्रीरामपूर, जि. नगर) कंपनीचे लेबल लावून बनावट मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अधिक तपासात दारूच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावले जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मार्केटिंग मॅनेजर धनेश अडवानी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.२१) धुळे तालुका पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.