Dhule Fraud Crime : दहिवदच्या शिक्षणसंस्थाचालकाला भामट्यांचा सव्वाचार लाखांना गंडा

Fraud Crime : दहिवद (ता. शिरपूर) येथील एसआरबी स्कूलचे संचालक डॉ. धीरज बाविस्कर यांची चार लाख २४ हजार रुपयांत फसवणूक केली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Dhule Fraud Crime : टाटा स्टील कंपनीचे अधिकृत विक्रेता असल्याचे भासवून तीन संशयितांनी दहिवद (ता. शिरपूर) येथील एसआरबी स्कूलचे संचालक डॉ. धीरज बाविस्कर यांची चार लाख २४ हजार रुपयांत फसवणूक केली. ही घटना ३ जूनला घडली होती. बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. बाविस्कर यांच्या फार्मसी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांना लोखंडी सळ्यांची गरज होती. (Dahiwad educational institution manager cheated )

त्यासाठी इंटरनेटवर इंडिया मार्ट या संकेतस्थळावर शोध घेत असताना त्यांना टाटा स्टील सप्लायर्सचे अधिकृत वितरक अशा नावाने नितीन गुप्ता नामक व्यक्तीचा पत्ता आढळला. त्याच्याशी संपर्क केल्यावर त्याने आपण वितरक असल्यास दुजोरा देऊन सहाय्यक दयाशंकर मिश्रा याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. डॉ. बाविस्कर यांनी मिश्राला फोन करून आवश्यक साहित्याची यादी दिली. मिश्राने त्यांना टाटा स्टीलच्या लेटरहेडवर कोटेशन पाठवून चार लाख २४ हजार ३७० रुपये आधी भरण्यास सांगितले.

त्याने दिलेल्या माहितीमध्ये टाटा स्टील लिमिटेड, अंधेरी (मुंबई) या नावाने एचडीएफसी बँकेत खाते असल्याचे नमूद केले. त्याचा क्रमांक आणि आयएफएसी कोडही त्याने पाठविला. त्यामुळे ३ जूनला बाविस्कर यांनी दहिवद येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जाऊन टाटा स्टीलच्या नावे धनादेश जमा केला. धनादेश दिल्याच्या माहितीसह खरेदीची ऑर्डर त्यांनी दयाशंकर मिश्रा याला पाठविली. त्याने ५ जूनला दहिवद येथे सर्व साहित्य पोहचविले जाईल, असे सांगितले.

Fraud Crime
Dhule Fraud Crime : कांदा व्यापाऱ्याची 58 लाखांत फसवणूक

५ जूनला साहित्य न मिळाल्याने बाविस्कर यांनी मिश्राशी संपर्क केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बाविस्कर यांनी टाटा स्टीलच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती घेतली असता कंपनी कोणत्याही एजंटमार्फत ऑर्डर किंवा रक्कम स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाविस्कर यांनी बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जाऊन तपास केला. त्यावर संबंधित बँक खाते टाटा स्टीलचे नसून आकाश माळी (रा. पाटणा, बिहार) या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले.

बाविस्कर यांच्या तक्रारीनंतर बँक ऑफ बडोदाने एचडीएफसी बँकेला तातडीने माहिती देऊन पैसे परत मागविण्याचा अर्जही सादर केला. एचडीएफसी बँकेच्या शाखेने पाटणा येथील कंकरबाग शाखेला पैसे परत देण्याबाबत निर्देश दिले. मात्र पैसे मिळू शकले नाहीत. बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून, संशयित नितीन गुप्ता, दयाशंकर मिश्रा, आकाश माळी (रा. पाटणा, बिहार) यांच्याविरोधात थाळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

''या फसवणुकीच्या प्रकरणात बँकांची भूमिका अधिक खेदजनक आहे. मी पैसे पाठवत असलेले खाते त्याच संस्थेचे आहे किंवा नाही याची पडताळणी संबंधित बँकांनी करणे आवश्यक होते. ही रक्कम एनईएफटीद्वारे वर्ग झाली. मी तातडीने बँकेकडे जाऊन पेमेंट थांबविण्याची विनंतीही केली. मात्र अद्यापही पैसे मिळू शकलेले नाहीत.''-डॉ. धीरज बाविस्कर, संस्थाचालक

Fraud Crime
Dhule Fraud Crime : देशी दारूच्या नकली लेबलद्वारे फसवणूक; नेरच्या तिघांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com