Dhule News : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व धुळे जिल्हा प्रशासनातर्फे पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे सोमवारी (ता. २६) ढोलताशा पथक, कलशधारी विद्यार्थिनी, वारकरी, लेझीम, झांज, आदिवासी नृत्य, टिपरी नृत्यांसह ग्रंथदिंडीसह मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता. (Dhule Great opening of Mahasanskrit Mahotsav)
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे.
उपायुक्त संगीता नांदुरकर, कर्नल शैलेंद्रकुमार गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यातील तरुणांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.
ग्रंथदिंडीचे आकर्षण
महासंस्कृती महोत्सवाची सुरवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली. यावेळी आरंभ ढोलताशा पथक, एकवीरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, कमलाबाई कन्या हायस्कूलच्या कलशधारी मुली, न्यू सिटी हायस्कूल विद्यार्थ्यांनी झांजपथक, एकलव्य सांस्कृतिक परिवार संस्थेमार्फत आदिवासी संस्कृती दर्शन, परिवर्तन हायस्कूल विद्यार्थ्यांनी टिपरीनृत्य, राजीव गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीचे सादरीकरण केले. (Latest Marathi News)
ही दिंडी शिवतीर्थमार्गे महापालिका, बारापत्थर चौकमार्गे पोलिस कवायत मैदान येथे दाखल झाली. तेथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्रकलेचे सादरीकरण, ड्रमवादन कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी संस्कृती प्रदर्शन तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सायली पराडकर, दिनेश कोयंडे यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी आभार मानले.
मंगळवारचे कार्यक्रम असे
मंगळवारी (ता. २७) सकाळी दहा ते साडेदहा धुळे येथील अंध मुला-मुलींच्या शाळेचे विद्यार्थ्यांचे ‘गीतगायन’, सकाळी साडेदहा ते अकरा नवनाथ वहीगायन मंडळ, बोरकुंड यांचे वहीगायन, सकाळी अकरा ते बारा श्री सद्गुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था,
धुळेतर्फे ‘खानदेशी लोककला आणि आहिराणी लोकगीत कार्यक्रम’ दुपारी बारा ते एकदरम्यान प्रा. केले मूकबधिर विद्यालय, धुळे सन्मती गतिमंद विद्यालय, धुळे, नवजीवन अस्थिव्यंग शाळा, श्री संस्कार गतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा धुळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी पाच ते साडेपाचदरम्यान श्री. बालन व सहकारी भरतांजली यांचा ‘भरतनाट्यम नृत्य’, सायंकाळी साडेपाच ते सहा वाजून २० मिनिटांपर्यंत सिद्धांत बहुउद्देशीय संस्था, धुळेचा ‘नृत्याविष्कार’, सायंकाळी सहा वाजून २० मिनिटे ते साडेसहादरम्यान एसव्हीकेएम स्कूलतर्फे ‘महाराष्ट्राची संस्कृती’ नृत्य, सायंकाळी साडेसहा ते साडेसात आबा चौधरी.
धीरज चौधरी व खानदेश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड, शिरपूर यांचा ‘आपली मायबोली खानदेशी अहिराणी गीते’ व सायंकाळी साडेसात ते रात्री दहादरम्यान डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे व सहकाऱ्यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.