Dhule Heavy Rain Damage: शहादा शहरासह तालुक्यात सर्वदूर मुसळधार! गोमाई, सुसरी, वाकी व कनेरी नद्यांना पूर; शेतकरी सुखावला

Dhule News : शेवटी पोहणाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्थांनी ट्रॅक्टरला कार बांधून बाहेर काढण्यात यश मिळवले. सुदैवाने कारचालक त्यातून वाचला.
A car stuck in flood water. In the second photo, the water accumulated in the playground of the municipal school in the city
A car stuck in flood water. In the second photo, the water accumulated in the playground of the municipal school in the cityesakal
Updated on

शहादा : शहरासह तालुक्यात सोमवारी (ता.२४) पहाटे साडेतीन वाजेपासून मुसळधार पाऊस झाल्याने नद्या, नाल्यांना मोठे पूर आले. शहादा-कहाटूळ रस्त्यावर मामाचे मोहिदा गावाला लागून असलेल्या नाल्याला मोठा पूर आला. पुराच्या पाण्यात कार अडकल्याने चांगलीच धावपळ उडाली होती. शेवटी पोहणाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्थांनी ट्रॅक्टरला कार बांधून बाहेर काढण्यात यश मिळवले. सुदैवाने कारचालक त्यातून वाचला. (Dhule Heavy rain all over taluka including Shahada city)

तालुक्यात पहाटेपासून जोरदार मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. साधारणत: सकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाऊस झाला. शहादा शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. नवीन वसाहतीमध्ये जिकडे तिकडे पाणी साचले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी ग्रामीण भागातील बसेस उशिरा गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे विद्युत पुरवठाही खंडित झालेला होता.

तालुक्यात सर्वत्र हा पाऊस झाल्याने गोमाई, सुसरी, वाकी व कनेरी या नद्यांना पूर आले. पहिल्यांदाच नद्यांना मोठे पूर आल्याने जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे. शेतकरी आता दोन दिवस शेतात वाफ होण्याची वाट पाहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे.

हा पाऊस शेतकऱ्यांना सर्वांनाच लाभदायक ठरणार आहे. गुरांच्या चाऱ्याच्या प्रश्न मिटणार असून शेतमजुरांनाही रोजगार मिळण्यास मदत होईल. नागरिक शेती कामांना मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे. मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापूस तसेच केळी, ऊस, मिरची या पिकांना जीवदान देणारा हा पाऊस ठरला आहे.

ग्रामीण भागातील साठवण बंधाऱ्यांमध्येही पाणी साचले आहे. विशेष म्हणजे दिवसभर पूर्णतः ढगाळ व पावसाळी वातावरण होते. उशिरा रात्री पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. पहाटेस आलेल्या पावसामुळे शहादा शहरातील बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येवर परिणाम झालेला दिसून आला. (latest marathi news)

A car stuck in flood water. In the second photo, the water accumulated in the playground of the municipal school in the city
Dhule Heavy Rain Damage : सर आली धावून, रस्ता गेला वाहून! कुयलीडाबर येथील प्रकार; ग्रामस्थांचे हाल

कारचालकाची फजिती

मामाचे मोहिदा गावात जाणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला होता. पुराच्या पाण्याच्या प्रवाहातून कार काढण्याच्या प्रयत्नात ती अडकली. सुदैवाने कार चालक वाचला. नंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टरच्या मदतीने कारला मोठा दोरखंड बांधून तिला बाहेर काढण्यात यश मिळवले. ग्रामस्थ मात्र कारचालकावर कमालीचा रोष व्यक्त करत होती. फरशीवरून पाणी वाहताना कार चालकाने प्रयत्न केल्याने त्याची चांगलीच फजिती झाली. तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरला.

दैनंदिन मंडळनिहाय पर्जन्य (मिमिमध्ये)

तालुका शहादा; कंसात एकूण

शहादा- १९.५ (४९.५)

मोहिदे- ६० (११८)

वडाळी- ३५ (१७५)

असलोद- ३३ (१०५)

सारंगखेडा- २९ (१४८)

प्रकाशा- १६ (९४)

कलसाडी- ५८ (१०५)

म्हसावद- ५६ (१२९)

ब्राह्मणपुरी- १७.३ (१४९.३)

मंदाणे- ०९ (३१)

--------

एकूण- ३३२.८ (११०३.८)

सरासरी- ३३.२८(११०.३८)

A car stuck in flood water. In the second photo, the water accumulated in the playground of the municipal school in the city
Dhule Heavy Rain Damage: दराणे-रोहाणे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस! अनेक गुरांचा बुडून मृत्यू, खलाणे मंडळात 92 मिमीची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.