Dhule Rain Damage: चिमठाणे महसूल मंडळात अतिवृष्टी, तर 3 मंडळांत पावसाची प्रतीक्षा! तीन म्हशी, दोन बैल व गाय वीज पडून मृत्युमुखी

Dhule News : बेटावद महसूल मंडळात मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस झाले तरी पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Water accumulated in the cotton fields due to rain on Tuesday afternoon in the outskirts of the village.
Water accumulated in the cotton fields due to rain on Tuesday afternoon in the outskirts of the village.esakal
Updated on

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी (ता. ११) दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात चिमठाणे महसूल मंडळात ६५ मिलिमीटर, तर नरडाणा, वर्शी व बेटावद महसूल मंडळात पाऊसच न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वीज पडून तालुक्यातील पाच गावांतील तीन म्हशी, दोन बैल व एक गाय मृत्युमुखी पडली. बेटावद महसूल मंडळात मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस झाले तरी पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Dhule Heavy rain in Chimthane revenue circle waiting for rain in 3 circles)

शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह काही महसूल मंडळांत पाऊस झाला. विजांमुळे खलाणे येथील शेतकरी प्रकाश देवराम देसले यांचा बैल, निशाणे येथील शेतकरी रंजय आबाजी पाटील यांची म्हैस, हतनूर येथील गावशिवरात विठ्ठल आत्माराम पाटील (रा. भडणे) यांची म्हैस, तामथरे येथील शेतकरी भरतसिंह पहाडसिंह गिरासे यांचा बैल, बाभुळदे येथील शेतकरी जहाँगीर दोधू पिंजारी यांची म्हैस व तामथरे येथील शेतकरी साहेबराव तुकाराम सोनवणे यांची गाय वीज पडून मृत्युमुखी पडली. वरील गावांतील तलाठ्यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

अतिवृष्टी अन्‌ पावसाची प्रतीक्षा

शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी दुपारी चिमठाणे मंडळात ६५ मिलिमीटर व शेवाडे मंडळात ५६ मिलिमीटर, तर नरडाणा व वर्शी मंडळात शून्य मिलिमीटर, तर बेटावद मंडळात आजपर्यंत एक मिलिमीटरही पाऊस झालेला नाही. (latest marathi news)

Water accumulated in the cotton fields due to rain on Tuesday afternoon in the outskirts of the village.
Nashik Unseasonal Rain Damage : ‘वळिव’ग्रस्तांना साडेपाच लाखांची मदत; मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख

कापूस व मका लागवड

मंगळवारी झालेल्या काही महसूल मंडळांत बुधवारी शेतकरी कापूस व मका लागवडीसाठी सकाळपासून मजुरांची धावपळ सुरू होती. चिमठाणे व शेवाडे महसूल मंडळात मका व कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

मंगळवारी महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस (कंसात एकूण पाऊस)

शिंदखेडा : ०१ (०७ मिलिमीटर )

नरडाणा : ०० (०५)

खलाणे : २५ (३०)

चिमठाणे : ६५ (८०)

वर्शी : ०० (०८)

बेटावद : ०० (००)

विरदेल : ०१ (०८)

दोंडाईचा : ०५ (०९)

विखरण : ०५ (१२)

शेवाडे : ५६ (५९)

Water accumulated in the cotton fields due to rain on Tuesday afternoon in the outskirts of the village.
Pune Rain Water Issue : पाणी साचते, पैसा मुरतो! गटारे बंद, महापालिका पडली उघडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com