Dhule News : ना वशिला, ना ओळख-इथे मिळते थेट मदत असे ब्रीद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत २८५ कोटी निधीतून ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले.
रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. केवळ एका फोनवर मदत उपलब्ध होते, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख राम राऊत, विस्तारक तथा युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रथमेश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. (information regarding CM Medical Assistance Scheme)