धुळे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीत बारावीची, तर मार्चमध्ये दहावीची परीक्षा होत आहे. या दोन्ही परीक्षांसाठी धुळे जिल्ह्यात एकूण ५२ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
बारावीसाठी ४६, तर दहावीसाठी ६६ केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी मंडळाने पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. (Dhule HSC SSC Exam 52 thousand students of class will take exam Appointment of 5 Bharari Teams)
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. बारावीच्या परीक्षांसाठी जिल्ह्यात २४ हजार ३०९, तर दहावीसाठी २८ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
जिल्हाभरात ४६ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा होईल. यात धुळे शहरात सात, धुळे ग्रामीण १५, साक्री तालुका १०, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांत प्रत्येकी सात केंद्रांचा समावेश आहे.
दहावीसाठी ६६ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. यात धुळे शहर १३, धुळे ग्रामीण १८, साक्री तालुका १३, शिरपूर तालुका नऊ व शिंदखेडा तालुक्यातील १३ केंद्रांचा समावेश आहे.
भरारी पथके नियुक्त
या दोन्ही परीक्षा सुरळीत, कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी मंडळातर्फे पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
त्यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्यांचा समावेश आहे.
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यात एकूण आठ कोठड्यांची व्यवस्था केली आहे. धुळे शहर व ग्रामीणसाठी तीन, साक्री तालुक्यासाठी दोन, शिरपूर तालुक्यासाठी एक, तर शिंदखेडा तालुक्यासाठी दोन कोठड्यांची व्यवस्था आहे.
संवेदनशील केंद्रांची स्थिती
जिल्ह्यात बारावीची १९ अतिसंवेदनशील केंद्रे आहेत. यात धुळे शहरात एक, धुळे ग्रामीणमध्ये पाच, शिरपूरमध्ये एक, साक्रीत तीन व शिंदखेडा शहरातील एका केंद्राचा समावेश आहे. तसेच २४ संवेदनशील केंद्रे आहेत.
दहावीची १२ अतिसंवेदनशील केंद्रे आहेत. यात धुळे शहरात एक, धुळे ग्रामीणमध्ये सहा, शिरपूरमध्ये एक, साक्री व शिंदखेड्यात प्रत्येकी दोन केंद्रांचा समावेश आहे. तसेच ३४ संवेदनशील केंद्रे घोषित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.