Dhule Municipality News : शहरात मुख्य जलवाहिन्यांवरदेखील अनेक ठिकाणी अवैधरीत्या नळ कनेक्शन्स घेतली गेली आहेत. अशा अवैध नळ कनेक्शन्सचा सुगावा लागल्यानंतर महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे ती काढून टाकण्याची कारवाई सुरू आहे. आठवडाभरापूर्वी चितोड रोड भागात तब्बल २४ कनेक्शन्स महापालिकेच्या पथकाने तोडून टाकली. त्यापूर्वीही मनपा शाळा-२८ येथील जलकुंभ भागातील पाच-सहा कनेक्शन्स तोडण्यात आली होती. ()
लोकसभा निवडणुकीनंतर अशा कारवायांना वेग मिळण्याची शक्यता आहे. धुळे शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न वर्षानुवर्षे जटिल राहिला आहे. आता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने हा प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागला आहे. मात्र, या वर्षी जलस्रोतांमध्ये पाणी कमी असल्याने कसरत कायम आहे. सद्यःस्थितीत चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येतो. दरम्यान, शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठ्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो.
गेल्या काही दिवसांत जलकुंभावरील व्हॉल्व्ह नादुरुस्तीसह इतर तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले. आता ते रुळावर आल्याचे अधिकारी म्हणतात. या तांत्रिक अडचणींशिवाय अवैध नळ कनेक्शन्समुळेही पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवर अवैध नळ कनेक्शन्स असल्याने काही भागात पाणीच पोचत नाही अशी स्थिती पाहायला मिळते. (latest marathi news)
तीस कनेक्शन्स तोडली
मुख्य जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन्स तोडण्याची कारवाई महापालिकेने हाती घेतली आहे. साधारण आठवडाभरापूर्वी चितोड येथे तब्बल २४ अवैध नळ कनेक्शन्स तोडण्यात आली. तत्पूर्वी जानेवारीतदेखील मनपा शाळा-२८ वरील जलकुंभावरील मुख्य जलवाहिनीवर पाच-सहा अवैध नळ कनेक्शन्स सापडली होती. तीही तोडण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत ३० कनेक्शन्स तोडण्यात आली आहेत.
पाणीपट्टी भरून पाणी नाही
मुख्य जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन्समुळे इतर काही भागातील नळांना एक थेंब पाणी पोचत नाही. अर्थात जे नागरिक रीतसर कनेक्शन्स घेतात, पाणीपट्टी अदा करतात त्यांना पाणी मिळत नाही आणि जे अवैध कनेक्शन्स घेतात ते २४ तास पाणी वापरतात अशी स्थिती पाहायला मिळते. अशी कनेक्शन्स तोडल्यामुळे ज्यांना पाणी मिळत नव्हते त्यांना आता पाणी मिळत आहे. त्यामुळे अशी अवैध कनेक्शन्स महापालिकेच्या रडारवर आहेत.
अजून १२ कनेक्शन्सचा सुगावा
शहरात मुख्य जलवाहिनीवर अजून १० ते १२ अवैध नळ कनेक्शन्स असल्याचा सुगावा महापालिका पाणीपुरवठा विभागाला लागला आहे. खातरजमा करून ही कनेक्शन्सदेखील तोडण्यात येणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गुंतल्याने मतदानानंतर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्य जलवाहिन्यांवर नळ कनेक्शन्स घेणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करू, असा इशारा मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.