RTE Admission : ‘आरटीई’अंतर्गत वाढीव प्रवेश नियमित होणार! शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

Dhule News : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशप्रक्रियेत पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त होणार असल्यास शाळांनी त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
RTE Admission
RTE AdmissionSakal
Updated on

Dhule News : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त होणार असल्यास शाळांनी त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित वाढीव प्रवेश नियमित करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेत केलेल्या बदलाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. (RTE Admission)

त्यामुळे यंदा आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेला जवळपास विलंब झाला. राज्य सरकारने आरटीई प्रवेशप्रक्रियेत केलेला बदल उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. तसेच आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अबाधित ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गोसावी यांची सूचना

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याअनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही स्थितीत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. २५ टक्के राखीव जागांवर आधीच प्रवेश दिलेल्या शाळांनीही पहिली.

पूर्वप्राथमिकच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळे संबंधित शाळांतील पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होणार असल्यास शाळांनी त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांना द्यावी. नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी ते प्रवेश नियमित करून द्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (latest marathi news)

RTE Admission
Dhule Rain : नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा; करवंद, अनेर, सुलवाडे, हतनूर प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत वाढ

धुळे जिल्ह्याची स्थिती

जिल्ह्यात १०५ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश निश्चित झाला. त्यानुसार एक हजार १३७ जागा आरक्षित आहेत. यासाठी जिल्ह्यातून एकूण दोन हजार ८४९ अर्ज दाखल झाले. त्यातील एक हजार १०२ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात ५४ शाळांत ४१९ जागा राखीव आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून ८८० अर्ज दाखल झाले. त्यातील २९८ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. आरक्षित जागांपैकी धुळे ३५, तसेच नंदुरबार जिल्ह्यात १२१ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

१६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १५९ शाळांमधील एक हजार ५५६ रिक्त जागांसाठी एकूण तीन हजार ७२९ अर्ज दाखल झाले. शिक्षण विभागाने काढलेल्या सोडतीतून एक हजार ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांतून आतापर्यंत १६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील १३८ आणि नंदुरबारच्या ३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

RTE Admission
Dhule News : हरणमाळ, नकाणे तलाव जम्बो कालव्याद्वारे भरा; माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.