कापडणे : देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी सुखी संसार सोडला. देशासाठी बलिदान दिले. ते अमर हुतात्मे झाले. त्या वेळी प्रत्येकानेच स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींच्या आदेशाने सारी गावेच्या गावे पेटून उठली, पण काही गावे इतिहासात अजरामर झाली.
खानदेशातील असे एक गाव म्हणजे ‘कापडणे’. जे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते अन् स्वातंत्र्यसैनिकांच्या पावलांवर पाऊल ठेवत देशरक्षणासाठी शेकड्यावर तरुण आज ‘जवान’ म्हणून कार्यरत आहेत. तेवढेच निवृत्त झाले आहेत. (Kapdane village Participation of entire village in non cooperation movement)