Dhule News : धुळे जिल्हा परिषदेने एकाच आवारातील दोन किंवा दोनपेक्षा अधिक शाळांचे रुपांतर एकाच शाळेत करण्याची प्रक्रीया मार्चपासून सुरु केली. यात पंधरा गावातील शाळांचा समावेश होता. प्रत्यक्षात तीनच गावातील शाळांचे जबरदस्ती एकत्रीकरण १५ जूनपासून केले आहे. पंधरा शाळा पटलावर असतांना तीनच गावातील शाळा का एकत्रीत केल्या आणि इतर बारा गावांकडे का दुर्लक्ष केले, असा सवाल शैक्षणिक वर्तुळातून विचारला जात आहे. (integration of schools of Kapadne Songir and Ner need equal justice )
धुळे जिल्हा परिषदेने अवधान, मोघण, शिरूड, सोनगीर, बोरीस, नेर, कापडणे, मालपूर, चिमठाणे, रुदावली, वर्षी, वारुड व नरडाणा येथील एकाच आवरात भरणाऱ्या शाळांचे एकाच शाळेत रूपांतर करण्याचा ठराव पारीत केला होता. मार्चमध्ये शाळा एकत्रीकरणाचा ठराव करण्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीकडूनच शाळा एकत्रीकरणाचा ठराव मागून घेतला होता.
हा ठराव घेण्यापूर्वी त्यात्या शाळांच्या मुख्याध्यापकांना जबरदस्तीने कामाला लावून घेतले होते. सर्वच शाळा ठराव देताहेत, तुम्ही का देत नाहीत, असे म्हणत एकाअर्थी धमकीवजा प्रेमाने ठराव करून घेतले होते. तेच ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत ठेवून पारीत करुन घेतले. (latest marathi news)
मग तीनच गावे का?
पंधरा गावांतील शाळा एकत्रीकरणाचे ठराव झालेले आहेत. पुन्हा मे महिन्यात झालेल्या बैठकीत आठ गावांतील शाळा एकत्रीकरणाचे आदेश झाले. प्रत्यक्षात १५ जुलैपासून कापडणे, सोनगीर आणि नेर येथील शाळा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ही तीनच गावे का, इतर पंधरा गावातील शाळांकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे प्रश्न शिक्षणप्रेमी व पालकांमधून उपस्थित होत आहेत.
ती गावे नेत्यांची?
कापडणे, नेर व सोनगीर वगळता इतर बारा गावातील नेत्यांचे जिल्हा परिषदेत वजन आहे. त्यांच्या गावातील वजन टिकून राहण्यासाठी त्यांनी एकत्रिकरणास तोंडी विरोध केला आहे. प्रशासनाने त्यांच्या शंकाचे निरस्सन केले नाही अन् या तीन गावांतील शाळांवर अन्याय केल्याचे गुरुजींमध्ये चर्चिले जात आहे. दरम्यान, शाळा एकत्रीकरण करायच्या आहेत, तर मग त्या बारा शाळांचाही तत्काळ समावेश करा. समान न्याय हवा. अन्यथा, या तीन गावांतील एकत्रीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.