Dhule Vidhan Sabha Election : शिवसेना उबाठाला जागा; गोटे उमेदवार की पुरस्कृत? विधानसभा मतदारसंघात रोचक घडामोडी

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या धुळे शहर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा नेमकी कुठल्या घटक पक्षाला सुटणार
Anil Gote felicitating MP Sanjay Raut during his city tour on Saturday.
Anil Gote felicitating MP Sanjay Raut during his city tour on Saturday.esakal
Updated on

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या धुळे शहर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा नेमकी कुठल्या घटक पक्षाला सुटणार? यावर रोज पैजा लागत आहेत. पडद्याआडच्या रोचक घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ही जागा सुटणार, अशा दिशेने नेत्यांची पावले पडत असल्याचे दिसते. त्यात आयात उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली जाणार असल्याचे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही समजून चुकले आहे. (Interesting change in Shiv Sena seat sponsored Assembly Constituency )

तो आयात उमेदवार शिवसेनेचा (उबाठा) अधिकृत उमेदवार असेल की महाविकास आघाडी पुरस्कृत इतकाच काय तो निर्णय बाकी असल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलतात. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि समाजवादीसह इतर मित्र पक्षांचा समावेश आहे. धुळे शहर मतदारसंघाची जागा आपणास मिळेल असे मानून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा, समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दोन महिन्यांपासून शहर ढवळून काढण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेसतर्फे युवराज करनकाळ, साबीर शेख, मुजफ्फर हुसेन, राष्ट्रवादीतर्फे माजी महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष रणजीत भोसले, उद्योजक सचिन दहिते, शिवसेना उबाठातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, समाजवादी पक्षातर्फे इर्शाद जहागीरदार यांनी दावेदारी केली आहे.

आघाडीतील इच्छुक

शहर मतदारसंघातील या प्रमुख पक्षांचे अवलोकन केले तर पक्षीय राजकारण व्यक्ती केंद्रित झाल्याचे दिसून येते. काँग्रेसने संघटनात्मकदृष्ट्या धुळे शहरात बळकटीकरणाचा फारसा प्रयत्न केला नाही. मुस्लीम समुदायाच्या एक गठ्ठा मतांवर काँग्रेससह राष्ट्रवादीचा डोळा राहिल्याचे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही माजी महापौर महाले, श्री. भोसले यांच्या पलीकडे कोण असा प्रश्‍नही राजकीय विश्‍लेषकांकडून मांडला जातो.

शहर मतदारसंघात सक्रीय राहात शिवसेना उबाठाने विविध प्रश्‍न हाताळत आंदोलनातून स्ट्राईक रेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. हे तीन पक्ष महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्याने ज्या घटक पक्षाला धुळे शहराची उमेदवारी मिळेल त्याला मुस्लीम व इतर विविध समुदायाची मते मिळतील आणि तो विजयी होऊ शकेल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते. (latest marathi news)

Anil Gote felicitating MP Sanjay Raut during his city tour on Saturday.
Dhule Vidhan Sabha Election 2024: धुळे शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला! भाजपच्या गोटात चिंता; विविध समीकरणे बदलण्याची चिन्हे

आयात उमेदवारास पसंती

महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असली तरी धुळे शहराची जागा शिवसेना उबाठाला मिळेल आणि लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे उमेदवार असतील अशा दिशेने शिवसेना नेत्यांची पावले पडताना दिसत आहेत. त्यास काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सहमती दर्शविल्याचे वतुर्ळात बोलले जाते. महायुतीच्या उमेदवाराला श्री. गोटे हेच टक्कर देऊ शकतात, ते विजयी होऊ शकतात, असे आघाडी नेत्यांना वाटते.

श्री. गोटे यांची स्वतःची वोट बँक आहे. त्यावर लक्ष ठेवत शिवसेना उबाठा त्यांना उमेदवारी देण्यास उत्सुक असल्याचे दिसते. शिवसेनेत (उबाठा) पक्षातलाच चेहरा उमेदवार म्हणून दिला जावा, अशी आग्रही मागणी पदाधिकारी कार्यकर्ते करीत असताना नेते श्री. गोटे यांना उमेदवारी देतात की ते महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील यासंबंधी निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष असेल.

जिथे शिंदे....तिथे ठाकरे...!

महाविकास आघाडीतील प्रदेश नेत्यांच्या बैठकीत शिवसेना उबाठातर्फे एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यात ज्या मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार असेल, त्या ठिकाणी शिवसेना उबाठाचाच उमेदवार दिला जावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसने भाजपविरूध्द उमेदवार द्यावे, अशी गळ शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी घातली.

त्यानुसार धुळे शहर मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला दिली गेल्याने त्याविरूध्द शिवसेना उबाठा रिंगणात असणार आहे. अशा वर्चस्वासह प्रतिष्ठेच्या लढतीसाठी शहराचे पूर्वी तीनदा आमदार राहिलेले श्री. गोटे यांना उमेदवारी देण्याच्या महाविकास आघाडीकडून गतिमान हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. अशात शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत शनिवारी (ता. ५) येथे उपस्थित असताना त्यांच्यासह श्री. गोटे यांच्यात वीस मिनिटे खलबते झाली

Anil Gote felicitating MP Sanjay Raut during his city tour on Saturday.
Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.