Dhule Hire Medical College : ‘ह्यूमन राइट’कडून हिरे मेडिकलचे पोस्टमॉर्टम! सचिवांकडून चौकशी

Dhule News : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय कोविड महामारीच्या कालावधीत चांगल्या सेवेमुळे, तर इतर वेळी अस्वच्छता, उदासीन कारभार आदी कारणांमुळे चर्चेत राहत असते.
Hire Medical College
Hire Medical College esakal
Updated on

Dhule News : शहरात साडेतीन दशकांपूर्वी स्थापन झालेले श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय कोविड महामारीच्या कालावधीत चांगल्या सेवेमुळे, तर इतर वेळी अस्वच्छता, उदासीन कारभार, अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांवर अंकुश नसणे, नातेवाइकांना रुग्णास स्ट्रेचर न्यावे लागणे आदी कारणांमुळे चर्चेत राहत असते. (Dhule Hire Medical Collage)

महाविद्यालयातील होस्टेलचे विद्यार्थी, तसेच ते परिसरात नशेखोर, गुंडांमुळे सुरक्षित नसतात, अशी तक्रार एका माजी विद्यार्थिनीने केली. त्याची गंभीरतेने सुमोटो दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने थेट सचिवांना धुळ्यात चौकशीसाठी पाठविले आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव नितीन पाटील (आएएस) गुरुवारी (ता. ११) सायंकाळी धुळ्यात दाखल झाले.

त्यांनी चौकशी सुरू केली आहे. यंदा हिरे मेडिकल गव्हर्न्मेंट कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थिनीने प्रसारमाध्यमाद्वारे या कॉलेजमधील गैरसोयी, गैरबाबींना वाचा फोडली. त्याची सुमोटो दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली. त्यानुसार तत्काळ सचिव पाटील यांना चौकशीसाठी धुळ्यात पाठविले.

नेमकी समस्या काय?

माजी विद्यार्थिनीची तक्रार अशी ः हिरे मेडिकल कॉलेज, होस्टेलला पुरेशी सुरक्षाव्यवस्था नाही. सीमेवर संरक्षक भिंती नाहीत. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसते. सुरक्षारक्षक नसतो. या बाबी चोरांना माहीत असल्याने होस्टेल व परिसरातून मोबाईल, लॅपटॉप, स्कूटी चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. परिसरात झाडेझुडपे असल्याने त्याचा आधार घेत नशेखोर त्यांचा उद्योग साध्य करतात. (latest marathi news)

Hire Medical College
Dhule News : आचारसंहितेनंतर पहिल्याच स्थायीत कोट्यवधींची कामे मंजूर, 75 लाखांवर कार्योत्तर खर्चही मान्य

मग चोरीचे प्रकार घडतात. पायी जाता-येताना विद्यार्थी, विद्यार्थिनीच नाहीत, तर प्राध्यापकांचेही मोबाईल, लॅपटॉप घेऊन चोर, नशेखोर पलायन करतात. परिसरातील निवासी प्राध्यापकांकडेही चोरीचे प्रकार घडतात. परिसरात वाढती गुंडागर्दी, तसेच होस्टेल व परिसरात अस्वच्छतेचा कहर असतो ही जटिल समस्या आहे.

बदनामीला घाबरतात

विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, स्कूटी वा इतर वाहन चोरीला गेले आणि संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास ते गेले, तर त्यांना वरिष्ठ अधिकारी प्रथम हिरे मेडिकलच्या अधिष्ठात्यांशी बोला आणि मग या, असा सल्ला देतात. वॉर्डन अधिष्ठात्यांपर्यंत पोचू देत नाही. अधिष्ठात्यांपर्यंत तक्रारदार विद्यार्थी पोचला, तर तक्रार करू नका, संस्थेची बदनामी होईल, असा सल्ला दिला जातो.

कुठल्याही स्तरावर कारवाईच होत नसल्याने विद्यार्थी भीतीखाली वावरत असतात, अशी माजी विद्यार्थिनीने तक्रार केली आहे. कॉलेज, होस्टेलच्या सीमेवर अपेक्षित संरक्षक भिंती न झाल्याने अशा घटना घडून हिरे मेडिकेल, पर्यायाने धुळ्याच्या लौकिकाला बदनामीचा डाग लागत असल्याची कैफियत माजी विद्यार्थिनीने अप्रत्यक्षपणे मांडल्याचे दिसून येते.

Hire Medical College
Dhule News : प्रकाशा- बुराई सिंचन योजनेचेही काम होणार सुरू : आमदार रावल; प्रयत्नांती 17 कोटींवर निधीची तरतूद

सातबाऱ्यावर नाव नाही, अतिक्रमणाचा प्रश्‍न

हिरे मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालयाची ३५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. शहरापासून सहा ते सात किलोमीटरवर सुरत बायपासलगत चक्करबर्डी येथे हिरे मेडिकलच्या इमारतींची उभारणी झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या व्यवस्थापनाला सरकारी जमिनीवरील हिरे मेडिकल व रुग्णालयाचे सातबाऱ्याला नाव लागले पाहिजे, असे वाटले नाही.

अशा उदासीन कारभाराचा फायदा भूमाफिया व अतिक्रमणधारकांनी घेतला. त्यांनी या ठिकाणी चौफेर अतिक्रमण केले असून, तेच आता अडथळा ठरत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी धाडसाने भूमाफियांचे कंबरडे मोडीत काढून सातबाऱ्यावर मेडिकल कॉलेजचे नाव लागावे यासाठी प्रयत्न केले, तर सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले होते. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

याअनुषंगाने मानवाधिकार आयोगाचे सचिव पाटील यांनी सातबाऱ्यावर मेडिकल कॉलेजचे नाव का लागले नाही, त्याचे कारण काय, सीमा निश्‍चित करून चौफेर संरक्षणार्थ संरक्षक भिंती का उभारल्या नाहीत.

Hire Medical College
Dhule News : दक्षता बाळगत वीज अपघात टाळावे! महावितरणचे आवाहन; धुळे, नंदुरबारसाठी संपर्क क्रमांक जाहीर

प्राप्त निधीचा विनियोग कसा होत गेला, त्या-त्या कालावधीतील जिल्हाधिकाऱ्यांनी काय-काय सहकार्य केले किंवा केले नाही याविषयी अधिष्ठात्यांशी चर्चा केली, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींशी शुक्रवारी (ता. १२) संवाद साधला. तसेच सचिव पाटील यांची चौकशी अद्याप सुरू असून, त्यांची पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशीही चर्चा केली.

"हिरे मेडिकलप्रश्‍नी राज्य मानवाधिकार आयोगप्रमुखांच्या आदेशानुसार चौकशी करीत आहे. हिर मेडिकल कॉलेज व रुग्णालयस्थळी पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांशी व जबाबदार घटकांशी संवाद साधला आहे. दोन दिवसांनंतर चौकशी अहवाल आयोगाकडे सादर केला जाईल. तसेच २१ जुलैला हिरे मेडिकलचे अधिष्ठाता, पोलिस अधिकारी व संबंधित सर्वांना बाजू मांडण्यासह सुनावणीकामी आयोगाकडे बोलाविण्यात आले आहे." - नितीन पाटील, सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई

Hire Medical College
Dhule News : रखडलेल्या गटार कामाने घेतला एका मजुराचा बळी; धुळ्यात सुरक्षिततेचे नियम अधिकाऱ्यांकडूनच धाब्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.