Dhule News : धुळे सहकारी खरेदी-विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १७ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडविला.
या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामतही जप्त झाल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली. निकालानंतर आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्रापासून आमदार पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. (Jawahar panel resounding victory rival BJP buying and selling union election)
धुळे सहकारी खरेदी-विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लि., धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ७) देवपूर भागातील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात मतदान झाले. मतदानानंतर लगेच दुपारी चारपासून मतमोजणीला सुरवात झाली.
या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणीत जवाहर शेतकरी विकास पॅनल व माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे एकूण १५ उमेदवारांनी निवडणूक लढविली. हे सर्व १५ उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले.
‘जवाहर’चे विजयी उमेदवार
जवाहर शेतकरी विकास पॅनलचे बापू नारायण खैरनार (एकूण मिळालेली मते १०६), संभाजी सिंधुजी गवळी (१०८), इंद्रसिंग नथुसिंग गिरासे (१०२), विलास वंसतराव चौधरी (१०७), रमेश दत्तात्रय नांद्रे (१०५), कैलास हिंमतराव पाटील (१०९), दिनकर दौलत पाटील (१०९), भटू गोरख पाटील (१०४), रोहिदास विठ्ठल पाटील (१०३), चूडामण सहादू मराठे (१०१), पंढरीनाथ बुधा पाटील (५४५), सुशीलाबाई भगवान चौधरी (५४२), अनिता योगेश पाटील (५५०), लहू काशीनाथ पाटील (४२६), सुनील यादवराव पाटील (३८९). विजयी उमेदवारांचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार पाटील, अश्विनी पाटील, शिवसेना नेते महेश मिस्तरी आदींनी अभिनंदन केले. (latest marathi news)
दोन उमेदवार बिनविरोध
दरम्यान, जवाहर शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघारीअंती यापूर्वीच बिनविरोध निवडून आले. त्यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून पोपट सहादू शिंदे (रा. उडाणे) व अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून अरविंद भालचंद्र शिरसाठ (रा. धनूर) यांचा यात समावेश आहे.
शेतकरी, सभासदांचा विजय
धुळे सहकारी खरेदी-विक्री आणि प्रक्रिया सोसायटीत जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय हा शेतकरी व सभासदांचा आहे. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची खरेदी-विक्री सोसायटी करून दाखवेन. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातील, जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल.
शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा भावना आमदार पाटील यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या विजयी सभेत व्यक्त केल्या. माजी मंत्री पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अश्विनी पाटील, महेश मिस्त्री, रायबा कुणाल पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.