Jayant Patil : महाविकास आघाडीचे सरकार येणार : जयंत पाटील

Dhule News : शिंदखेडा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामास गती देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
NCP (Sharadchandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting.
NCP (Sharadchandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting.esakal
Updated on

शिंदखेडा : आगामी विधानसभा निवडणुकीतून राज्यातील भ्रष्ट महायुतीचे सरकार जाणार असून, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. तसे होताच शिंदखेडा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामास गती देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. (Jayant Patil statement Mahavikas Aghadi government will be formed from upcoming assembly elections)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमवारी (ता. २२) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश संघटक शिवाजीराव पाटील, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, आशाताई पाटील, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे.

हेमलता शितोळे, ॲड. तुषार वळवी, डॉ. कैलास ठाकरे, जुही देशमुख, ललित वारुडे, आधार पाटील, नरेंद्र पवार, नरेश पवार, डॉ. जितेंद्र ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील, सदस्य दुल्लभ सोनवणे, प्रकाश बोरसे, राकेश पाटील, त्र्यंबक पदमोर, डॉ. नितीन चौधरी, महेंद्र निकम आदी उपस्थित होते.

सरकारकडून निधी नाही

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की शिंदखेडा मतदारसंघात आठपैकी चार उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, सहा गावे पाणीपुरवठा योजनेसाठी ३०४ कोटींची योजना मंजूर केली. प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यतेस चालना दिली. या मतदारसंघात लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असताना राज्य सरकारकडून निधी दिला नाही, असे सांगत श्री. पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. (latest marathi news)

NCP (Sharadchandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting.
Dhule News : धुळ्यात प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक झगमगाट! LED पथदीपांची स्थिती; अद्यापही 3628 एलईडींची गरज

भाजपवर सोडले टीकास्त्र

भाजपने दोन पक्ष फोडण्याचे काम केले. भाजपमध्ये निष्ठावंतांची कदर होत नाही. निष्ठावंतांना खड्यासारखे बाहेर काढून स्वतःची टोळी निर्माण केली जात असल्याचा घणाघात श्री. पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीवेळी ‘लाडकी बहीण’ नव्हती. आता लाडक्या खुर्चीकडे पाहून ‘लाडकी बहीण’ झाली आहे.

येत्या काळात माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे, असे अभियान राष्ट्रवादीने हाती घेतले आहे. त्यानुसार चांगला जाहीरनामा दिला जाईल. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी जनतेने ताकदीने उभे राहावे आणि मतदारसंघाचा विकास करून घ्यावा, असेही श्री. पाटील म्हणाले.

विकास केला नाही

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निकम म्हणाले, की भाजपचे ३२ वर्षे निष्ठेने कार्य केले. शिंदखेडा मतदारसंघात एकही मोठे विकासाचे काम झाले नाही. शिक्षण, सिंचन व उद्योगासंबंधी नारा आमदार जयकुमार रावल यांनी दिला. त्यामुळे शेतकरी हितासाठी २२ उपसा सिंचन योजना सुरू झाल्या पाहिजेत.

NCP (Sharadchandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting.
Dhule News : कानबाईच्या रोटची जय्यत तयारी! खानदेशात उत्साह; 11 ऑॅगस्टला कानबाई महोत्सव

शेतात पाणी पोहोचण्यासाठी लढायचे आहे, असे सांगत मतदारसंघाऐवजी आमदारांनी स्वतःचा विकास केल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. प्रदेश सरचिटणीस बेडसे म्हणाले, की २० वर्षांत आमदार रावल यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम हाती घेतले. आगामी काळात शिंदखेडा तालुका शिरपूर तालुक्यासारखा करू.

मेळाव्यात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमात कामराज निकम यांचा प्रवेश झाला. यानंतर कार्यकर्त्यांच्या सोमवारी (ता. २२) झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत श्री. निकम समर्थक विविध गावांतील माजी सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य आदी असंख्य कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला.

NCP (Sharadchandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting.
Dhule News : जुने ट्रक टर्मिनल ‘धूळखात’! पावणेसात कोटींचे ‘नवे’ मंजूर; पथदीप देखभाल-दुरुस्तीसाठीही नवीन तीन ठेकेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.