Dhule Flood News : पूरपरिस्थितीमुळे काकाणी, भडगावचा संपर्क तुटला! फरशी पूल वाहून गेल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांची गैरसोय

Latest Dhule News : ककाणी गावालगत गावठाण, राजबाई शेवाळी व भडगावकडे जाण्यासाठी उमराड नाल्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी पाईप मोरी व फरशीचे काम झाले आहे.
Bad condition of the road leading to village due to heavy rain. In the second picture, villagers are risking their lives to wade through the water
Bad condition of the road leading to village due to heavy rain. In the second picture, villagers are risking their lives to wade through the wateresakal
Updated on

म्हसदी : गेल्या तीन दिवसांपूर्वी साक्री तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. ढगफुटीसदृश्‍य पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना आलेल्या पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला आहे. ककाणी गावालगत उमराड नाल्यावरील फरशी वाहून गेल्याने मालेगावकडे जाणाऱ्यांचा संपर्क तुटला आहे.

वाहतूक खोळंबली आहे. शिवाय ककाणी गावठाणकडे जाणारा रस्ताही वाहून गेला आहे. याबाबत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याने वाहनधारक व ग्रामस्थांची हेळसांड होत आहे. (Kakani Bhadgaon lost contact due to flood situation)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.