Ekvira Devi : खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी भक्त निवासाचे काम पूर्ण; रोषणाईला वेग

Ekvira Devi : खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ म्हणून धुळे शहरातील देवपूरमधील श्री एकवीरादेवी मंदिराची ओळख आहे.
Shri Ekvira Devi
Shri Ekvira Deviesakal
Updated on

धुळे : खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ म्हणून धुळे शहरातील देवपूरमधील श्री एकवीरादेवी मंदिराची ओळख आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाचे काम पूर्ण झाले असून विविध ट्रस्टतर्फे रोषणाईसह तयारीला वेग आला आहे. पांझरा नदीकिनारी निसर्गरम्य वातावरणात असलेले श्री एकवीरादेवी आणि रेणुकामाता मंदिर पूर्वापार गुरव घराण्याच्या वहिवाटीत होते. (Kulswamini Shree Ekvira Devi Bhakta Niwas of Khandesh completed for navratri )

सुमारे चारशे वर्षांपूर्वी मंदिराचा पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला. मंदिर हेमाडपंथी व प्राचीन असून, पूर्वाभिमुखी आहे. श्री एकवीरा व रेणुकामाता आदिशक्ती श्री पार्वतीची रूपे मानली जातात.

देशभरातून येतात भाविक

भाविकांच्या सहकार्याने १९६७ व १९८७ मध्ये टप्पाटप्प्याने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ट्रस्टतर्फे १९८८ मध्ये मंदिराचे सुशोभीकरण झाले. संकट दूर करीत मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम होतात. चैत्रात यात्रा भरते.

दर पौर्णिमेला मंदिराच्या आवारात पालखी निघते. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी भागातून भाविक येतात. त्यांच्यासाठी काहीअंशी भक्त निवासाचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर ट्रस्टने नवरात्रोत्सवानिमित्त तयारी सुरू केली आहे. (latest marathi news)

Shri Ekvira Devi
Ekvira Devi Yatrotsav : श्री एकवीरादेवी यात्रोत्सवामुळे वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

- मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहील

- ३ ऑक्टोबरला सकाळी १० ला घटस्थापना

- सात ऑक्टोबरला सकाळी १० ला कुमारिका पूजन

- ११ व १२ ऑक्टोबरला सकाळी पूर्णाहुती व प्रसाद

- १२ ऑक्टोबरला सकाळी महानवमी सुवासिनी पूजन

- १२ रोजी सकाळी दसरा सीमोल्लंघन

- पोलिस, महापालिका प्रशासनाकडून नियोजनाला सुरवात

Shri Ekvira Devi
Navratri 2022 : पहिली नवदुर्गा दत्त भिक्षालींग मंदिरातील ‘एकांबिका’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.