Dhule News : प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मुहूर्त मिळेना; व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष यंदाही विस्कळित

Dhule : आरक्षणाबाबत असलेली संदिग्धता यांमुळे जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे.
CET exam
CET examesakal
Updated on

Dhule News : एमएचटी सीईटीच्या पर्सेंटाइल गुणांवरून सुरू झालेला वाद आणि त्याचबरोबर आरक्षणाबाबत असलेली संदिग्धता यांमुळे जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार एक ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, यंदाही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्षभराचे वेळापत्रक विस्कळित होण्याची शक्यता आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) घेतलेल्या १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी १२ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ( Lack of time to start admission process academic year of professional courses is also disrupted this year )

निकाल जाहीर होऊन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाकडून कोणतीही सूचना जाहीर केलेली नाही. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा सुरळीत पार पडल्या. जून महिन्यामध्ये या परीक्षांचे निकाल संकेतस्थळावर जाहीर होऊ लागले. आतापर्यंत एमएचटी सीईटी, बीएस्सी नर्सिंग, डीपीएन, पीएचएन, बी.एचएमसीटी, एम.एचएमसीटी, बीए, बीएस्सी बी.एड आणि विधि पाच वर्षे आदी अभ्यासक्रमांचे निकाल सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. (latest marathi news)

CET exam
Dhule News : संपादित जमिनीचा मोबदला लवकरच : आमदार पाटील; अक्कलपाडा प्रकल्प वितरिकांसाठीचे भूसंपादन

या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन दहा ते पंधरा दिवस उलटले तरी अद्याप सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर केलेली नाही. एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतही संदिग्धता आहे. त्यामुळे इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियाही अद्याप सुरू झालेल्या नाहीत. परिणामी, विद्यार्थी आणि पालकांचा जीव सध्या टांगणीला आहे.

CET exam
Dhule News : उपाशी मरण्यापेक्षा बंदुकीची गोळी खाऊन मरू! शेतकऱ्यांची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.