Dhule News : परवानाधारकांनी शस्त्रे जमा करावी; जिल्हा निवडणूक यंत्रणेची सूचना

Dhule : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी ते ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असतील त्या पोलिस ठाण्यात त्यांनी शस्त्र जमा करावे.
Collector Abhinav Goyal
Collector Abhinav Goyalesakal
Updated on

Dhule News : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी ते ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असतील त्या पोलिस ठाण्यात त्यांनी शस्त्र जमा करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेत. (Dhule Licensee must deposit weapons Notification of District Election System)

जिल्हाधिकारी गोयल यांनी पत्रकात म्हटले आहे, की गृह विभागाकडील मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधीत संबंधित पोलिस ठाण्यात जमा होण्यासाठी पोलिस विभागाने कळविले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीत लोकसभा निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याने सार्वजनिक उपद्रव.

नुकसान, जीवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी त्यांनी धारण केलेल्या शस्त्र, परवान्यावरील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावी. (latest marathi news)

Collector Abhinav Goyal
Dhule Lok Sabha Election : आचारसंहितेप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; विशेष कक्षाची स्थापना

अर्ज सादर करावा

न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांच्याकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व नोंदणीकृत खासगी सुरक्षारक्षक यांना त्यांच्याकडे असलेले शस्त्र जमा करण्याबाबत सुट देण्यात येत आहे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणे शक्य नाही.

अशा शस्त्र परवानाधारकांनी गुरुवारी (ता. २१) सायंकाळी पाचपर्यत धुळे जिल्हादंडाधिकारी तथा समिती अध्यक्ष, गृह शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्वयंस्पष्ट कारणासह स्वतंत्र अर्ज सादर करावा. त्यानुसार प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरणनिहाय निर्णय घेईल, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी पत्रकाद्वारे कळविले.

Collector Abhinav Goyal
Dhule Lok Sabha Election : मतदारसंघात 19 लाखांवर मतदारांची नोंद : अभिनव गोयल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.