Dhule District Collector : मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीची दुकाने बंद! जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा आदेश

Dhule News : धुळे जिल्ह्यातील सर्व अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
Liquor shops closed on counting day Collector order
Liquor shops closed on counting day Collector orderesakal
Updated on

Dhule News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता धुळे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. ४) मतमोजणी होणार आहे. या दिवशी धुळे जिल्ह्यातील सर्व अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी गोयल यांनी म्हटले आहे, की धुळे जिल्ह्यातील धुळे शहर. (Liquor shops closed on counting day Collector order)

धुळे ग्रामीण, शिंदखेडा हे विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघ व शिरपूर विधानसभा मतदारसंघ हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने ४ जूनला सर्व अबकारी अनुज्ञप्त्या निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

संबंधित सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती, सीएल-२, सीएल-३, सीएल, एफएल, टीओडी-३, एफएल-१, एफएल-२, एफएल-३. (latest marathi news)

Liquor shops closed on counting day Collector order
Dhule Lok Sabha Constituency : निकालाबाबत उत्सुकता शिगेला; आकडेमोड सुरुच

एफएलबीआर-२, टीडी-१ अनुज्ञप्तीधारकांनी मतमोजणीच्या दिवशी दुकाने (अनुज्ञप्ती) उघडे ठेवू नयेत. तसेच विक्री व अन्य व्यवहार करू नयेत, याची नोंद घ्यावी.

या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Liquor shops closed on counting day Collector order
Dhule Seed News : कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री; आमदार रावलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com