Dhule News : सुरळीत विजेसाठी जीव खांबाले टांगला..! पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वायरमनांचा कर्तव्यदक्षपणा

Dhule News : पाऊस उघडल्यावर रात्रीच्या वेळी विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना वायरमन कर्मचाऱ्यांचा जीव अक्षरशः खांबाला टांगला अशीच असते.
Electricity workers while working on the channel
Electricity workers while working on the channelesakal
Updated on

म्हसदी : पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना, वादळ नसतानाही नेहमी वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न वीजग्राहकांना पडणे तसे साहजिकच. कर्तव्य म्हणून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची धावाधाव होते. कुठे बिघाड झाला यासाठी रात्रीच्या वेळीदेखील (पेट्रोलिंग) शोधाशोध करावी लागते हे सांगणे न लगे.

पाऊस उघडल्यावर रात्रीच्या वेळी विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना वायरमन कर्मचाऱ्यांचा जीव अक्षरशः खांबाला टांगला अशीच असते. खांबावर चढून काम करताना अनेक कर्तव्यदक्ष वीज कर्मचाऱ्यांचा यापूर्वी जीवही गेल्याचे वास्तव आहे. (Dhule Dutifulness of wiremen at night during rainy season)

वीज वितरण यंत्रणेवर ऊन-पावसाचा नेहमीच परिणाम होतो. पावसाळ्यात सुरवातीला जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी कर्मचारीदेखील माणूसच असल्याने रस्तोरस्ती भटकत वीजवाहिन्यांवर बिघाड शोधावा लागतो.

ते काम काही तासांत होत नसल्याने वीजग्राहकांचा रोष स्थानिक वायरमन वा तत्सम कर्मचाऱ्यांना पत्कारावा लागतो. दुसरीकडे हे वारंवार का घडते याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांचे सपशेल दुर्लक्ष असते. कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंत्यापासून थेट अधीक्षक अभियंत्यापर्यंतचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांना आदेश करून नामानिराळे राहतात.

काम करावे लागते ते फील्डवर असणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनाच. अशा वेळी ज्या गोष्टीमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल अशा गोष्टीची कायमस्वरूपी दुरुस्ती झाली तर स्थानिक कर्मचाऱ्यांची दमछाक होणार नाही. शिवाय कुणाचा जीवही जाणार नाही याची खबरदारी घेतली जावी, अशी अपेक्षा जनमानसात व्यक्त केली जाते.

वीजपुरवठा खंडत होण्याची मुख्य कारणे

वीजखांबावर असलेले चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे पिन किंवा डिस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर उन्हाळ्यात तापतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडल्यावर त्यास तडे जातात. यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजपुरवठा खंडित होतो. संततधारेमुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.

त्याचप्रमाणे वादळामुळे झाडे आणि मोठ्या फांद्या पडून वीजतारा तुटतात किंवा त्यावर पडतात. यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय वीज यंत्रणेवर अति वाढलेला भार, पक्षी आणि प्राणी वीजयंत्रणेवर बसून शॉर्टसर्किट निर्माण करणे तसेच दुरुपयोग यामुळेदेखील वीजपुरवठा खंडित होतो. (latest marathi news)

Electricity workers while working on the channel
Jalgaon Electricity Supply : पारोळ्याची वीज व्यवस्था 12 कर्मचाऱ्यांवर! पूर्वपावसाळी कामांसोबत वाढीव मनुष्यबळाची गरज

अभियंते, जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खऱ्या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचाऱ्यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो.

भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र (वायरमन) यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो. अशा वेळी वीजग्राहकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत अभियंते व जनमित्रांना (वायरमन) वारंवार फोन न करता महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००२-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

"शेतकरी बांधवांनी वीजवाहिन्यांच्या खाली पाळीव प्राणी बांधू नयेत, तसेच पावसाळ्यात विजेच्या खांबाजवळून पाळीव प्राणी जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. वीजपंप सुरू करताना हातात ग्लोव्हज सुरक्षा म्हणून वापरावेत."-एक वीज कर्मचारी (वायरमन), वीज वितरण कंपनी

Electricity workers while working on the channel
Dhule News : मर्चंट बँकेतील ठेवींचा 43 कोटींचा विमा मंजूर : विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई; टप्प्याटप्प्याने होणार वितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.