Dhule Lok Sabha Constituency : 'लोकसंग्राम', जनता दलामुळे काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस!

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची फेरपुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये भाजप विरूध्द काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची फेरपुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये भाजप विरूध्द काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती. त्या वेळी काँग्रेसचा केवळ १९ हजार ४१९ मतांनी निसटता पराभव झाला. यात मतविभाजनामुळे चुरशीच्या ठरलेल्या लढतीत जनता दल सेक्युलर, लोकसंग्राम पक्षामुळे काँग्रेसचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले होते. (Dhule Lok Sabha Constituency)

मालेगाव मध्य मतदारसंघाने काँग्रेसला तारण्याचा प्रयत्न केला, तर धुळे शहर मतदारसंघाने मतांची गणिते बिघडवून टाकली. यंदाच्या निवडणुकीत अशी चुरस पहावयास मिळते किंवा कसे याकडे मतदारसंघाचे लक्ष असेल. मतदारसंघ २००९ ला खुल्या संवर्गासाठी आरक्षित झाल्यावर दहा उमेदवार रिंगणात उतरले.

यात प्रामुख्याने भाजपचे प्रताप सोनवणे (सटाणा), काँग्रेसचे अमरिशभाई पटेल (शिरपूर), जनता दल सेक्युलरचे निहाल अहमद मोलवी मोहम्मद उस्मान (मालेगाव), लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे (धुळे) या चौघा उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. या लढतीत मत विभाजनाचे डावपेच कुणाच्या पथ्यावर पडतात हा औत्सुक्याचा विषय होता.

मतदानाची अशी स्थिती

मतदारसंघात सरासरी पंधरा लाख ८० हजार मतदार होते. पैकी उमेदवार सोनवणे यांना दोन लाख ६३ हजार २६०, उमेदवार पटेल यांना दोन लाख ४३ हजार ८४१, उमेदवार निहाल अहमद यांना ७२ हजार ७३८, उमेदवार गोटे यांना ५३ हजार ६३७ मते मिळाली होती. निकालात पटेल यांचा १९ हजार ४१९ मतांनी पराभव करत सोनवणे यांनी विजय मिळविला होता. (Latest Marthi News)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु

एकूण मतदानापैकी सोनवणे यांना १६.७१ टक्के, पटेल यांना १५.४८ टक्के, अहमद यांना ४.६२ टक्के, तर गोटे यांना ३.४१ टक्के मतदान झाले होते. प्रमुख दोन उमेदवारांत सोनवणे यांना बागलाण मतदारसंघात ५१.८ टक्के, मालेगाव बाह्य ५१ टक्के, मालेगाव मध्य ३.४ टक्के, धुळे ग्रामीण ५३.९ टक्के, धुळे शहर २७.८.

तर शिंदखेडा मतदारसंघात ४५.५ टक्के, तसेच अनुक्रमे पटेल यांना बागलाणला ३८.७ टक्के , मालेगाव बाह्यला ३३.६, मालेगाव मध्यला ३९.८, धुळे ग्रामीणला २८.७, धुळे शहरात २८.३, तर शिंदखेडा मतदारसंघात ४७.७ टक्के मते मिळाली.

काँग्रेसचे स्वप्न धुळीस

या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य आणि धुळे शहराकडे नजर टाकली, तर सोनवणे यांना मालेगाव मध्यमध्ये ३ हजार ९३१, पटेल यांना ४६ हजार ०८६, तर निहाल अहमद यांना ५८ हजार ६१, गोटे यांना १ हजार ९२ मते मिळाली होती.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Loksabha Election Code of Conduct : सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, उपोषण, लाउडस्पीकरला निर्बंध

तसेच धुळे शहरात सोनवणे यांना २५ हजार ४२१, पटेल यांना २५ हजार ८४३, अहमद यांना ७ हजार ५३५, तर गोटे यांना सर्वाधिक २९ हजार ५ मते मिळाली होती. लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गोटे आणि जनता दलाचे उमेदवार निहाल अहमद यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला मत विभाजनाचा मोठा फटका बसला.

परिणामी, उत्तर महाराष्ट्रात विकासपुरूष म्हणून बोलबाला असलेल्या आमदार पटेल यांना निसटता पराभव स्विकारावा लागला आणि भाजपचे उमेदवार सोनवणे विजयी झाले होते. निवडणुकीत असे डावपेच घडत असतात. ते यंदाही कसे रचले जातात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Loksabha Constituency : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.