Dhule Lok Sabha Constituency : यंदा साक्री तालुक्याची साथ कुणाला, भाजप की पुन्हा कॉंग्रेस?

Dhule News : आदिवासीबहुल साक्री विधानसभा मतदारसंघ काही अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
Congress, Bjp
Congress, Bjp esakal
Updated on

Dhule News : आदिवासीबहुल साक्री विधानसभा मतदारसंघ काही अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील तालुक्यातून कॉंग्रेसला आघाडी मिळाली होती. ती होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत टिकून राहते की भाजप यंदा आघाडी घेईल हा सध्या उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

आदिवासी समाजाचे प्राबल्य असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाचा पुनर्रचनेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला. तालुक्यावर वर्चस्व राखण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपात नेहमीच प्रतिष्ठेची लढत होत असते. काही अपवाद वगळता तालुक्याने अनेक वेळा कॉंग्रेसला साथ दिलेली आहे.

मात्र २०१४ मध्ये मोदी लाटेत तालुक्यातून तत्कालिन भाजप उमेदवार डॉ.हीना गावित यांना प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्यापेक्षा १ हजार ७४७ अधिक मते देत आघाडी दिली होती. मात्र गेल्या निवडणुकीत परिस्थिती पुन्हा बदलली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि भाजप आमने-सामने असताना कॉंग्रेस उमेदवार ॲड. के. सी.पाडवी यांना भाजप उमेदवार खासदार डॉ. हीना गावित यांच्यापेक्षा ९ हजार ८७७ मतांची आघाडी तालुक्यातून मिळाली होती. गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये असणारे तालुक्यातील अनेक नेते आता भाजपमध्ये आहेत. तर गेल्यावेळी भाजपध्ये असणाऱ्या आमदार मंजुळा गावित या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून निवडून आलेल्या असून, त्या सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. अशावेळी त्यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वपूर्ण असणार आहेत. (Latest Marathi News)

Congress, Bjp
Dhule Lok Sabha Constituency : 'लोकसंग्राम', जनता दलामुळे काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस!

कॉंग्रेस, भाजपचे कसब पणाला

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा कॉंग्रेसकडे यावा यासाठी पराभवाची कसर काढत कॉंग्रेस आघाडीने कंबर कसली आहे. पक्षातर्फे माजी मंत्री ॲड. के. सी.पाडवी यांचे चिरंजीव, तरुण आणि नवीन चेहरा म्हणून ॲड.गोवाल पाडवी यांना रिंगणात उतरवले आहे.

तर भाजपकडून आदिवासी विकासमंत्री डॉ.विजकुमार गावित यांच्या कन्या, खासदार डॉ.हीना गावित यांना पुन्हा एकदा उमेदवारी देत विजयी पताका कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कॉंग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्याबद्दलची सुरुवातीची कोण गोवाल पाडवी अशी ऐकू येणारी चर्चा आता मात्र थांबून त्यांनी डॉ.गावित यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.

गेली १० वर्ष खासदार असल्याने डॉ.गावित यांच्याविषयी अँटी इन्कम्बन्सी दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात त्यांचा तालुक्यातून कमी झालेल्या संपर्कातून सुप्त नाराजी आहे. ही नाराजी केवळ मतदारांमध्ये नसून अनेक स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये देखील दिसून येत आहे.

Congress, Bjp
Dhule Lok Sabha Election : मतदानास ओळखपत्राचे 12 पुरावे ग्राह्य

याचा अंदाज घेत मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी नाराज नेत्यांना जवळ करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तालुका भाजपमध्ये सध्या नेत्यांची मांदियाळी दिसत असली तरी त्यात वर्चस्वाच्या संघर्षातून अंतर्गत गटा-तटामुळे एकसंघपणा दिसत नाही. दुसरीकडे कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र कामाला लागल्याचे चित्र आहे.

आमदार मंजुळा गावित या महाविकास आघाडीत असल्या तरी त्यांचे समर्थक पदाधिकारी अजूनही भाजपच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून येत नाहीत. अशावेळी लोकसभा निवडणुकीत साक्री तालुक्यातून यंदा कुणाला आघाडी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Congress, Bjp
Dhule Summer Heat : किमान तापमानही वाढल्याने ‘वैताग’; विजेच्या लपंडावाने त्रासात भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.