Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभेचा उमेदवार बदला काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी; जिल्हाध्यक्ष सनेर यांचा राजीनामा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या उमेदवार माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचा जनमाणसात संपर्क नाही.
Shyam Saner
Shyam Saner
Updated on

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या उमेदवार माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचा जनमाणसात संपर्क नाही. त्या मतदारसंघाबाहेरील आहेत. त्यामुळे पक्षहित आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उमेदवार बदलावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील असंख्य आक्रमक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. (Dhule Lok Sabha Constituency)

या नाराजीतून इच्छुक उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला आहे. काँग्रेसने डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. श्री. सनेर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या शिंदखेडा तालुक्यातील समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. नाराजीनाट्यातून श्री. सनेर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला.

त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान झाला, असे म्हणत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही मुळचे काँग्रेसी विचारांचे असून कॉंग्रेसपासून दूर नाहीत. दोन दिवसांत उमेदवार बदलण्याचा ठोस निर्णय झाला नाही तर पक्ष त्यागाचा इशाराही श्री. सनेर यांनी दिला आहे. मतदारसंघातील पक्षाच्या कुठल्याही निष्ठावंताला उमेदवारी दिली जावी.

नाही तर तितकीच सक्षम भूमिका आम्ही घेऊ. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करू. निवडणुकीसाठी पैसा नाही, गरीब उमेदवार, अशी अवहेलना केली जाऊ नये. ती माझ्याबाबत होत असल्याचे जाणवल्याने व्यथीत होऊनच राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे श्री. सनेर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (dhule political news)

Shyam Saner
Dhule Loksabha Election Code of Conduct : सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, उपोषण, लाउडस्पीकरला निर्बंध

मतदारसंघाचे लक्ष लागून

जिल्ह्यातील या घडामोडींनंतर प्रदेशस्तरावर काय निर्णय घेतला जातो याकडे धुळे लोकसभा मतदारसंघाचे लक्ष असेल. जिल्ह्यात सार्वे (ता. शिंदखेडा) येथे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत श्री. सनेर यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी झाली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, त्यांच्यासाठी लोकनिधी संकलित करू, पदरमोड करून मतदारसंघात प्रचार करू आणि भाजपला लढा देऊ.

तीन दशकांपासून श्री. सनेर काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते भाजपमध्ये गेल्यावरही काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात श्री. सनेर यांनी पक्षाला सोडले नाही, त्यामुळे त्यांच्या निष्ठेची पावती उमेदवारीतून द्यावी, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री तथा पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब थोरात, धुळे जिल्ह्यातील नेते व प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

Shyam Saner
Dhule Loksabha Constituency : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.