Dhule Lok Sabha Constituency : टेक्स्टाईल पार्कचे स्वप्न अधुरेच! काँग्रेसची घोषणा हवेत विरली

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात विकासाला स्कोप असल्याचे नेते मंडळी सांगते. मात्र, कथनी आणि करणीत अंतर पडत असल्याने विकासाबाबत या मतदारसंघाची परवड सुरूच आहे.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency esakal
Updated on

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात विकासाला स्कोप असल्याचे नेते मंडळी सांगते. मात्र, कथनी आणि करणीत अंतर पडत असल्याने विकासाबाबत या मतदारसंघाची परवड सुरूच आहे. या क्षेत्रात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. किंबहुना, कॉटन हब म्हणूनही हा मतदारसंघ ओळखला जातो. याअनुषंगाने शेतकरीहित, रोजगारनिर्मिती, आर्थिक उलाढाल वाढीसाठी टेक्स्टाईल पार्कचे स्वप्न दाखवून काँग्रेसने काही काळ मते मिळविली. (Dhule Lok Sabha Constituency dream of textile park remains unfulfilled marathi news)

तोच कित्ता गिरवित भाजपनेही टेक्स्टाईल पार्कचे स्वप्न अधुरेच ठेवले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तब्बल पाच दशके, तर भाजपने अडीच दशकातील गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता ताब्यात ठेवली आहे. मात्र, या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाची ब्लू प्रिंट किंवा लाईन मार्क ना काँग्रेसने मतदारांपुढे मांडली ना, भाजपने मांडल्याचे दिसून आले. त्यामुळे या मतदारसंघात विकासाची परवड सुरूच आहे.

कॉटन हबचे क्षेत्र

धुळे मतदारसंघातील धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ, तर लगतच्या नंदुरबार मतदारसंघातील शिरपूर, साक्री (जि. धुळे) विधानसभा मतदारसंघ कॉटन हब म्हणून ओळखला जातो. शिवाय धुळे मतदारसंघातील मालेगाव आणि बागलाण (जि. नाशिक) विधानसभा मतदारसंघातही कापसाचे उत्पादन घेतले जाते.

तसे ते नाशिक जिल्ह्यातही घेतले जाते. त्यामुळे धुळे, मालेगावचा शहरी भाग सोडला, तर उर्वरित धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, बागलाण या चारही विधानसभा मतदारसंघात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. या पांढऱ्या सोनेरूपी पिकावर सरासरी दीड ते दोन लाख शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे कापसाची आर्थिक उलाढलही मोठी आहे. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : उमेदवारीवरून राजकीय धुळवडीमुळे रंगत

कापसाचे उत्पादन असे

धुळे जिल्ह्यात सरासरी सव्वाचार लाख हेक्टरवर पिक पेरणीत अडिच लाख हेक्टरवर, तर नाशिक जिल्ह्यात सरासरी ६० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होत असते. यात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सरासरी एक लाख हेक्टर, शिंदखेडा मतदारसंघात सरासरी ९० हजार हेक्टर, मालेगाव बाह्य (ग्रामीण) मतदारसंघात सरासरी ४० हजार हेक्टर, तर बागलाण मतदारसंघात सरासरी ७० हेक्टरवर कापसाची लागवड होत असते. असे चारही विधानसभा मतदारसंघात दरवर्षी सरासरी एकूण तीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते.

घोषणा हवेत विरली

उत्तर महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघ कॉटन हब म्हणून विकसीत होण्यास चांगला वाव आहे. ते काँग्रेसच्या राजवटीतील लोकप्रतिनिधी आणि उद्योगमंत्र्यांनाही अवगत होते. त्यामुळेच केंद्र पुरस्कृत नरडाणा (ता. शिंदखेडा) ग्रोथ सेंटर या औद्योगिक वसाहतीत टेक्स्टाईल पार्क विकसीत करण्याची घोषणा त्या वेळचे उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. एका टेक्स्टाईल कंपनीच्या माध्यमातून तशी सुरूवात झाली. नंतर त्या कंपनीने प्रकल्प पूर्ण होण्याच्या आतच बस्तान आवरले. त्यामुळे टेक्स्टाईल पार्कचे स्वप्न २००४ नंतर अपुरेच राहिले. विशेष म्हणजे त्यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचेच खासदार होते.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यासाठी मतदार संघातीलच उमेदवार द्यावा : डॉ. शेवाळे

मतदारसंघ भाजपकडे

धुळे लोकसभा मतदारसंघ २००९ ला भाजपने विजयातून सर केला. पुढे याच पक्षाची मतदारसंघावर पकड कायम आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत कॉटन हब विकसीत करण्याकडे नेते, खासदारांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र अधोरेखीत होत आहे. कापसावर आधारित वस्त्रोद्योगाचा विकास आणि त्यातून रोजगारनिर्मितीची संधी भाजपने उपलब्ध करून दिली असती तर काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या दुर्लक्षाची कसर भरून काढता येणे शक्य होते.

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणीत सरकार राहिल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना कॉटन हब आणि टेक्स्टाईल पार्क विकसीत करण्याला वाव देणे, त्यासाठी केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटर व अन्य ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आणणे शक्य होते. परंतु, तशा ठोस प्रयत्नांअभावी टेक्स्टाईल पार्कचे स्वप्न दोन्ही राजवटीत अधुरेच राहिले. या स्वप्नपूर्तीची प्रतिक्षा मतदारांना असेल.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : ‘वंचित’ कडून मतविभाजनाचे डावपेच सुरू; मुस्लीम उमेदवाराला संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.