Dhule Lok Sabha Constituency: भाजप नको म्हणून काँग्रेसला मतदान! मताधिक्यप्रश्‍नी पाच मतदारसंघांनी डॉ. भामरेंची साथ सोडली

Lok Sabha Election 2024 Result : उमेदवारासह भाजपवर नाराज मतदारांनी ‘काँग्रेस बदलेगी हालात’वर विश्‍वास दर्शवत मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार निवडीचा बहुमान डॉ. शोभा बच्छाव यांना प्रदान केला.
Dr. SUbhash Bhamare & Dr. Shobha Bachhav
Dr. SUbhash Bhamare & Dr. Shobha Bachhavesakal
Updated on

Dhule Lok Sabha Constituency : बलाढ्य भाजपकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा, सक्षम बूथरचना, वरिष्ठ स्तरावरून पुरविली जाणारी रसद आणि पाठीशी नेत्यांचे बळ, तर दुसरीकडे दुबळी काँग्रेस, कार्यकर्त्यांची वानवा, विस्कळित बूथरचना आणि फॅमिली प्रचाराची होणारी टीका...असे चित्र लोकसभेच्या धुळे मतदारसंघात दिसत होते.

मात्र, उमेदवारासह भाजपवर नाराज मतदारांनी ‘काँग्रेस बदलेगी हालात’वर विश्‍वास दर्शवत मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार निवडीचा बहुमान डॉ. शोभा बच्छाव यांना प्रदान केला. (Dhule Lok Sabha Majority of votes by five constituencies Left dr Bhamre)

धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता वगळली, तर धुळे शहरात एमआयएम, शिंदखेड्यात भाजप, मालेगाव मध्य एमआयएम, मालेगाव बाह्यला शिवसेना (शिंदे गट) आणि सटाणा-बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात १५ वर्षांपासून भाजप स्थिरावलेला होता.

त्यामुळे काँग्रेसची ताकद क्षीण झाल्यासारखी होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची फारशी ताकदही मतदारसंघात नाही. तरीही धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना विलंबाने उमेदवारी जाहीर झाली.

बच्छाव पोचल्या नाहीत

भाजपची बूथरचना सक्षम होती. सहा विधानसभा मतदारसंघांत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज होती. प्रचाराची विविध साधने ताकदीनिशी वापरली जात होती. उमेदवाराला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी सभा घेतली.

उमेदवाराला सर्व प्रकारचे बहुमोल पाठबळ भाजपने पुरविले. याउलट काँग्रेसकडून ऐनवेळी नवख्या चेहऱ्याची महिला उमेदवार दिली गेली. त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा पुरेसा फौजफाटा नाही. बूथरचना सक्षम नव्हती. प्रचार साधनेही तुटपुंजी होती. पक्षाकडून फारसे बहुमोल पाठबळ नव्हते. त्यामुळे मोजकी गावे वगळता अन्य गावांत काँग्रेस उमेदवार डॉ. बच्छाव पोचू शकल्या नाहीत. तरीही मतदारांनी त्यांना स्वीकारले हे विशेष.(latest marathi news)

Dr. SUbhash Bhamare & Dr. Shobha Bachhav
Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : डॉ. हीना गावितांच्या पराभवामुळे नंदुरबारचे केंद्रीय मंत्रिपद हुकले!

भाजपवर राग व्यक्त

कांदा निर्यातबंदी, कापसाला चांगला दर नाही, तसेच महागाई, बेरोजगारी, औद्योगिक विकास, तसेच पिण्याचा पाणीप्रश्‍न, शेतीविकास, सिंचन यासह रोजच्या जीवनमरणाशी निगडित प्रश्‍नांवर काय दिलासा देणार हे भाजपचे नेते प्रचारात सांगत नसल्याने मतदारांची नाराजी लपून राहिली नाही.

त्यामुळे भाजपवरील राग मतपेटीतून व्यक्त करत मतदारांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिली. धुळे मतदारसंघात काँग्रेस किंवा उमेदवार बच्छाव यांनी फार काही विकासकामे केली होती, विरोधकाची भूमिका सक्षमपणे मांडली होती, असे काहीही नव्हते. तरीही मतदारांनी विश्‍वासाने डॉ. बच्छाव यांच्या हाती मतदारसंघाच्या विकासाची दोरी सोपविली.

लीड का दिला नाही?

माजी आमदार, माजी महापौर डॉ. बच्छाव या नाशिकला वास्तव्यास आहेत. धुळे भागाऐवजी नाशिककडील उमेदवार दिला गेल्याने काँग्रेस पक्षांतर्गत नाराजीनाट्यही रंगले होते. ते पक्षश्रेष्ठींनी थोपविले. हिंदू समाज आणि मराठा-पाटील समाजाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शोभा बच्छाव यांना मुस्लिमबहुल मालेगाव मध्य मतदारसंघातून एक लाख ९४ हजार ३२७ मते मिळाली. या मताधिक्याचा आकडा गाठून विजयासाठी अधिक मते डॉ. भामरे यांना मिळू शकली नाहीत. उर्वरित हिंदूबहुल पाच मतदारसंघांतील मतदारांनी मताधिक्याबाबत भाजपची साथ का सोडली, हा नेत्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. (latest marathi news)

Dr. SUbhash Bhamare & Dr. Shobha Bachhav
Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

धुळे लोकसभा मतदारसंघ : पक्षनिहाय मताधिक्याची (लीड) स्थिती

मतदारसंघ.................२०१४.....................२०१९......................२०२४

धुळे ग्रामीण................७८,४४२ (भाजप).........९९,१३१ (भाजप).........६४,२३९ (भाजप)

धुळे शहर..................४६,९५५ (भाजप).........२९,४६४ (भाजप) .........४,८२४ (भाजप)

शिंदखेडा...................३३,२६६ (भाजप).........५३,५८९ (भाजप)..........४३,४२५ (भाजप)

मालेगाव मध्य..............१,०६,७७६ (काँग्रेस)..... १,२०,९२१ (काँग्रेस)......१,९४,३२७ (काँग्रेस)

मालेगाव बाह्य..............६९४८६ (भाजप)...........९४,१४७ (भाजप)..........५५,२१२ (भाजप)

सटाणा......................२८,६१४ (भाजप)...........७२,२३१ (भाजप).........२१,९१३ (भाजप))

Dr. SUbhash Bhamare & Dr. Shobha Bachhav
Palghar Lok Sabha Election Result : कमी मताधिक्याने दगाबाजीचा आरोप! मोखाड्यात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.