Dhule Lok Sabha Election Vote Counting: मतमोजणी निरीक्षकांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी! मतमोजणी तयारीचा आढावा

Lok Sabha Election Vote Counting : या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून, रविवारी (ता. २) मतमोजणी निरीक्षक एस. मालती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
Vote Counting Inspector S. Collector Abhinav Goyal giving information to Malti
Vote Counting Inspector S. Collector Abhinav Goyal giving information to Maltiesakal
Updated on

Dhule Lok Sabha Election Vote Counting : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून शासकीय गुदाम (नगावबारी, देवपूर, धुळे) येथे होणार आहे. या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून, रविवारी (ता. २) मतमोजणी निरीक्षक एस. मालती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. (Dhule Lok Sabha constituency election Inspection of counting center)

या वेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) स्नेहल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती एस. मालती यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी व्यवस्थेची पाहणी करून केलेल्या तयारीचा आढावा घेतला. (latest marathi news)

Vote Counting Inspector S. Collector Abhinav Goyal giving information to Malti
Baharampur Constituency Lok Sabha Election Result : अधीर रंजन चौधरी यांच्या 'बालेकिल्ला'ला युसूफ पठाणने लावला सुरूंग

या वेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठकव्यवस्था, विविध सोयी-सुविधांची उभारणी, उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलिसांना पुरवावयाच्या सुविधा, पोलिस सुरक्षा, वाहनतळ जागानिश्चिती, वाहतूक वळविणे, कायदा व व्यवस्थेबाबत माहिती दिली. एस. मालती यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीसाठी केलेली तयारी व या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

Vote Counting Inspector S. Collector Abhinav Goyal giving information to Malti
Lok Sabha Election :भारतातून मेटाला सर्वाधिक बिझनेस कोणाकडून? फेसबुक आणि इंस्टाग्रामवर राजकीय पक्षांची कोटींची उड्डाणे..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.