Dhule Lok Sabha Constituency : ज्येष्ठ- तरुणांच्या लढतीत काँग्रेसचे डावपेच निस्तेज

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील २०१९ मधील निवडणुकीत काँग्रेसने प्रस्थापित भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काँग्रेसने नेते आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली.
MLA Kunal Patil, Dr. Subhash Bhamre
MLA Kunal Patil, Dr. Subhash Bhamreesakal
Updated on

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील २०१९ मधील निवडणुकीत काँग्रेसने प्रस्थापित भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काँग्रेसने नेते आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपचे ज्येष्ठ उमेदवार आणि काँग्रेसच्या तरुण उमेदवारामधील ही लढत वैशिष्टपूर्ण आणि रोमांचक ठरली होती. (Dhule Lok Sabha Constituency)

परंतु, मोदी करिष्म्यापुढे काँग्रेसचे डावपेच निस्तेज ठरले आणि आमदार पाटील यांचा दोन लाख २९ हजार २४३ मतांनी पराभव झाला होता. धुळे लोकसभा मतदारसंघातील २०१९ ची निवडणूक आठवणीतील ठरली. भाजपने हा मतदारसंघ हिरावून घेतल्याने अस्वस्थ काँग्रेसने तरुण उमेदवार अर्थात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या पराभवाचा चंग बांधला.

भाजपने दुसऱ्यांदा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाच उमेदवारीची संधी दिली. त्यामुळे ज्येष्ठ उमेदवाराविरुध्द तरूण उमेदवार अशी ही लढत रंगली. काँग्रेसने नवा चेहरा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. या माध्यमातून भाजपशी तुल्यबळ लढत दिली जाईल आणि निकालात परिवर्तन घडवून आणले जाईल, अशी अटकळ नेत्यांनी बांधली.

जाणकारांचा प्रश्‍न

काँग्रेस ताकदीनिशी निवडणुकीच्या रणांगणात उतरली तरी मोदींच्या करिष्म्यापुढे टिकू शकेल का हा जाणकारांपुढेही प्रश्‍न होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी एकूण मतदानापैकी ५७.५ टक्के मतदान झाले. त्यात दहा लाख ८८ हजार ५७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Latest Marathi News)

MLA Kunal Patil, Dr. Subhash Bhamre
Dhule Lok Sabha Constituency 2024 : भाजप अन् काँग्रेस उमेदवारांपुढे अंतर्गत गटबाजीचे आव्हान

खासदार डॉ. भामरे यांना सर्वाधिक सहा लाख १३ हजार ५३३ मते मिळाल्याने ते विजयी झाले. आमदार पाटील यांना तीन लाख ८४ हजार २९० मते मिळाली. त्यांना भाजपकडून दोन लाख २९ हजार २४३ मतांनी पराभव पत्करावा लागला. खासदार डॉ. भामरे यांना ५६.५४, तर आमदार पाटील यांना ३५.४२ टक्के मते मिळाली होती. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ पैकी १२ उमेदवार मुस्लीमबहुल समाजातील होते.

डावपेच निस्तेज

काँग्रेसला मुस्लीमबहुल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एक लाख २६ हजार २७३ मते मिळाली, तुलनेत भाजपला पाच हजार ३५२ मते मिळाली. उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपच्या मतांची आघाडी काँग्रेसला गाठता आली नाही आणि मोदी, भामरेंच्या करिष्म्यापुढे काँग्रेसचे डावपेज निस्तेज झाल्याचे दिसून आले.

धुळे ग्रामीण मतदारसंघात खासदार डॉ. भामरे यांना एक लाख ५३ हजार ९९५, तर स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील उमेदवार आमदार पाटील यांना ५४ हजार ८६४, धुळे शहरात भामरे यांना ८६ हजार ८८७, तर पाटील यांना ५७ हजार ४२३, शिंदखेडा मतदारसंघात भामरे यांना एक लाख १३ हजार ६६७.

तर पाटील यांना ६० हजार ७८, मालेगाव बाह्यमध्ये भामरे यांना एक लाख ३२ हजार ४२२, तर पाटील यांना ३८ हजार २७५ आणि बागलाण मतदारसंघात खासदार भामरे यांना एक लाख १७ हजार ९५४, तर पाटील यांना ४५ हजार ७२३ मते मिळाली.

MLA Kunal Patil, Dr. Subhash Bhamre
Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.