Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरून आजी-माजी जिल्हाध्यक्ष गायब!

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. त्यातून नाशिक व धुळ्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांमध्ये नाराजीनाट्य, त्यातून राजीनामानाट्य घडले.
Congress
Congressesakal
Updated on

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. त्यातून नाशिक व धुळ्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांमध्ये नाराजीनाट्य, त्यातून राजीनामानाट्य घडले. अशात पक्षाच्या जाहीर उमेदवारासाठी शुक्रवारी (ता. १९) येथे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची बैठक झाली. (Dhule Lok Sabha Constituency former district president missing from Congress party banner )

या संदर्भात स्थानिक पक्ष पातळीवरील बॅनरवरून दोन्ही जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र गायब दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी नाशिकचे जिल्हाध्यक्ष असताना डॉ. तुषार शेवाळे आणि धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर इच्छुक होते. त्यांच्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित केली.

त्यातून नाराजीनाट्य सुरू झाले. ते डॉ. शेवाळे आणि श्री. सनेर यांच्या राजीनामास्त्रापर्यंत पोचले. पक्षाचे निष्ठावंत असून, मतदारसंघातीलच कुठलाही उमेदवार द्यावा, मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार देऊ नये, अशी भूमिका मांडत प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा स्वीकारावा, अशी भूमिका डॉ. शेवाळे, श्री. सनेर यांनी पत्राद्वारे मांडली. तसेच उमेदवार बदलण्यासाठी त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलेला असताना पक्षश्रेष्ठींनी निर्णयासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी मागून घेतला.

...अन्‌ रंगतदार चर्चा

असे असताना पक्षाने डॉ. शेवाळे यांचा राजीनामा स्वीकारत श्री. सनेर यांना अप्रत्यक्ष ‘शॉक’ देण्याचा प्रयत्न केला. नंतर श्री. सनेर भूमिका बदलतील आणि पक्ष प्रचाराच्या कामाला लागतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटते आहे. (latest marathi news)

Congress
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

श्री. सनेर यांची भूमिका व त्यांचा राजीनामा स्वीकारावा किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या उपस्थित प्रदेश कार्याध्यक्ष व श्री. सनेर यांची बैठक झाली. त्यातील तपशील समजू शकलेला नाही.

एकीकडे या घडामोडी घडत असताना पक्षाच्या उमेदवारासाठी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आमदार कुणाल पाटील संपर्क कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. त्या वेळी व्यासपीठावर आणि सोशल मीडियावर झळकणाऱ्या बॅनरवरून डॉ. शेवाळे, श्री. सनेर यांचे छायाचित्र गायब झाल्याचे दिसून आले.

त्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट, रंगतदार चर्चा सुरू झाली. बैठकीत मी खानदेशची कन्या, तर नाशिकची सून आहे. धुळे, फागणे येथे शिक्षण झाले असून, मावशी व नातेवाईक धुळ्यात राहतात, असे सांगत डॉ. बच्छाव यांनी परकी नसल्याची, मतदारसंघाबाहेरची नाही, अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.

Congress
Dhule Water Scarcity : टंचाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी, सीईओ गोताण्यात; भूजल पातळीत घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.