Dhule Lok Sabha Constituency : प्रस्थापित भाजपपुढे काँग्रेसचा कस! दुरंगी लढतीमुळे मताधिक्यासाठी कमालिची चुरस

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी माघारीची प्रक्रिया सोमवारी (ता. ६) संपुष्टात आली.
Subhash Bhamre, Shobha Bachhao
Subhash Bhamre, Shobha Bachhaoesakal
Updated on

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी माघारीची प्रक्रिया सोमवारी (ता. ६) संपुष्टात आली. यानंतर मतदारसंघात भाजप महायुती आणि काँग्रेस महाआघाडीमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. या दुरंगी लढतीमुळे निवडणुकीत कमालीची चुरस पहावयाला मिळेल, तसेच वंचित बहुजन आघाडी, ‘एमआयएम' रिंगणात नसल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये मतांसाठी चढाओढ असेल. ( main fight will be between BJP Grand Alliance and Congress Grand Alliance)

दीड दशकांपासून भाजपने हा मतदारसंघ ताब्यात ठेवल्याने या लढतीत काँग्रेसचा कस लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. यानंतर त्यांच्या एका याचिकेवरील निर्णय सोमवारी माघारीची प्रक्रिया संपेपर्यंत दाखल झाला नव्हता. त्यामुळे श्री. रेहमान रिंगणातून बाद झाले.

‘एमआयएम'तर्फे मालेगाव येथील एक मौलाना उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, त्यांची समजूत काढली गेल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम, दलित, आदिवासी समाजाची मते विभाजन करू शकणारे हे दोन पक्ष रिंगणाबाहेर राहिल्याने काँग्रेसला हायसे, तर भाजपला काहीशी चिंतेत टाकणारी ही स्थिती मानली जाते.

काँग्रेसची अटकळ

काँग्रेसची मदार ही मालेगाव मध्य, धुळे व दोंडाईचा शहरासह परिसरातील मुस्लीमबहुल भाग आणि सहा विधानसभा क्षेत्रातील दलित, आदिवासी मतदारांवर असेल. यात मुस्लीम समाजाची मते भाजपकडे जाणार नाहीत. त्यामुळे ती अधिकाधिक पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस ताकद पणाला लावेल. शिवाय दलित, आदिवासी समाजाची मते काँग्रेसकडे आकर्षित होण्यासाठी डावपेच केले जातील. या स्थितीत काँग्रेस मतदारसंघात प्रस्थापित भाजपला चांगली लढत देऊ शकेल, प्रसंगी विजयश्री मिळवू शकेल, अशी काँग्रेससह महाआघाडीचे नेते अटकळ बांधून आहेत. ( latest political news )

Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Constituency : निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी! 10 वर्षात सर्वांगिण विकासाअभावी मतदारात रोष

भाजपचा विजयी पॅटर्न

भाजपला मुस्लीमबहुल मालेगाव मध्य मतदारसंघातील निवडणुकीत पाच हजारापेक्षा अधिक मते मिळत नाहीत. धुळे शहरातही सरासरी ८० हजार मतांच्या मुस्लीमबहुल भागातून भाजपला पसंती मिळण्याचे काही कारण नाही. ते जाणून असल्याने २००९ च्या निवडणुकीपासून भाजपने मराठा- पाटील समाजबहुल गावे आणि ओबीसी मते पदरात पाडून घेण्याची रणनिती अंमलात आणली. ती २०१९ च्या निवडणुकीपर्यंत यशस्वी ठरत आली आहे. तो भाजपचा विजयी पॅटर्न म्हटला जातो. ते लक्षात घेऊनच काँग्रेसने भाजपप्रमाणे मराठा- पाटील समाजाच्या महिला उमेदवारास प्रतिनिधीत्व दिले आहे.

दुरंगी लढतीकडे लक्ष

दोन मराठा- पाटील समाजाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, डॉ. शोभा बच्छाव यांच्यात कडवी लढत होताना मतांसाठी कमालीची चढाओढ असणार आहे. मत विभाजनाचा ऐरणीवर असलेला प्रश्‍न वंचित आघाडी आणि `एमआयएम` रिंगणार बाहेर असल्याने बऱ्याचअंशी संपुष्टात निघाला आहे. त्यामुळे २००९ पासून मतदारसंघात प्रस्थापित भाजप पक्ष विजयाची हॅट्‌ट्रीक साधण्यासाठी काय डावपेच अंमलात आणतो आणि त्यास काँग्रेस पक्ष कशी लढत देतो याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

रिंगणातील अंतिम १८ उमेदवार

धुळे लोकसभा मतदारसंघात माघारीनंतर १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन मेपर्यंत ३० उमेदवारांनी ४२ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज छाननीत २२ उमेदवारांचे पत्र वैध, तर आठ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Constituency : महाशक्ती प्रदर्शनातून डॉ. भामरेंचा अर्ज!

रिंगणातील उमेदवार असे : जहूर अहमद मोहम्मद युसुफ (जम जम), बहुजन समाज पार्टी, शोभा दिनेश बच्छाव (इंडियन नॅशनल कॉग्रेस), सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पार्टी), नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजी नाथू पाटील (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मुकिम मिना नगरी (भीम सेना), शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया),

अब्दुल हफीज अब्दुल हक (अपक्ष), इरफान मो. इसहाक (नादिर, अपक्ष), भरत बाबुराव जाधव (अपक्ष), मलय प्रकाश पाटील (अपक्ष), मोहम्मद आमिन मोहम्मद फारुख (अपक्ष), मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष), राज चव्हाण (अपक्ष), शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख (अपक्ष), ॲड. सचिन उमाजी निकम (अपक्ष), सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर (सुरेश बापू, अपक्ष), संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष).

Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Constituency : दुरंगी की तिरंगी...लढतीचे तूर्त त्रांगडे! वंचित बहुजन आघाडी छाननीत बाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.