Dhule Lok Sabha Constituency : दहिते कुटुंबीयांच्या उमेदवारीकडे लक्ष

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा रंगलेली आहे.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा रंगलेली आहे. धुळ्यातून भाजपकडून इच्छुक असलेले हर्षवर्धन दहिते किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून बंडखोरी होणार का, या संदर्भात सध्या मतदारसंघात चर्चा घडत आहेत. (Dhule Lok Sabha Constituency)

काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते, पदाधिकारी हर्षवर्धन दहिते यांचे बंधू सचिन दहिते यांच्या संपर्कात असून, सचिन यांची काँग्रेसकडून लढण्याबाबत चाचपणी केली जात आहे. सचिन दहिते हे काँग्रेसच्या गळाला लागल्यास धुळे लोकसभेतील चुरस अधिक वाढणार आहे. भाजपमधील युवा नेते आणि कृषी सभापती हर्षवर्धन दहिते हे धुळे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते.

त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ विविध माध्यमांतून पिंजून काढलेला होता. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केल्यावर सर्वच इच्छुकांच्या आशा संपुष्टात आल्या. मात्र, त्यानंतरही डॉ. भामरे यांच्यासंदर्भात मतदारसंघात नाराजीचा सूर उमटलेला दिसून येतो. डॉ. भामरे यांच्याविरुद्ध होर्डिंग किंवा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून विरोध दर्शविला. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Municipality News : थकबाकीदार 108 गाळेधारकांना अखेरची नोटीस, जप्तीचा इशारा

भाजपकडून अन्य इच्छुक असलेले निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर हेही उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. भाजपमधून उमेदवारीच्या आशा जवळपास संपुष्टात आलेल्या असल्याने काँग्रेसच्या उमेदवारावर धुळे लोकसभेतील समीकरणे अवलंबून असतील. डॉ. तुषार शेवाळे, श्याम सनेर यांची नावे आधीपासून चर्चेत आहेत.

त्यात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव पुढे आले. आविष्कार भुसे यांच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा झाली. या नावांची चाचपणी करीत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी दहिते यांचे पुत्र सचिन दहिते यांचेही नाव समोर आले आहे.

त्यामुळे आता दहिते कुटुंबीयांमधून कुणी धुळे लोकसभेच्या रिंगणात असेल का? या प्रश्नाभोवती चर्चा फिरत आहेत. भाजपच्या उमेदवाराचा मुकाबला करण्यासाठी सक्षम, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा शोध काँग्रेस लवकर पूर्ण करेल, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule News : पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतींना कार्ड; धुळे जिल्ह्यात पावणेतीन हजार जलस्रोतांची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.