Dhule Lok Sabha Constituency : सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघ सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. भाजपने दुसऱ्याच यादीत विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करुन धक्का दिला.
Shyam Saner, Dr. Tushar Shewale
Shyam Saner, Dr. Tushar Shewale esakal
Updated on

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघ सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. भाजपने दुसऱ्याच यादीत विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करुन धक्का दिला. याउलट कॉंग्रेसचा उमेदवार निश्‍चितीचा घोळ महिनाभर सुरु होता. पाच दिवसांपूर्वी कॉंग्रेसने अखेर डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव - धुळे विभागात नाराजी नाट्य सुरु झाले. (Dhule LoK Sabha Constituency)

नाशिक व धुळे या दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, श्‍याम सनेर यांनी राजीनामे दिले. पक्षश्रेष्ठींनी डॉ. शेवाळे यांचा राजीनामा स्विकारत प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करुन उमेदवारीत बदल होणार नाही याचा जणू काही संदेश यातून दिला आहे. आता माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.

परिवर्तन मंचच्या पुढाकाराने सोशल मिडीयाद्वारे उमेदवार चाचपणीसाठी मंगळवार (ता. १६) दाभाडी येथे सकाळी साडेदहाला बैठक होणार आहे. या बैठकीस निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या मात्र उमेदवारीची माळ गळ्यात न पडलेल्या कॉंग्रेस व भाजप इच्छूक उमेदवारांच्या समर्थकांनी उपस्थित रहावे.

यासाठी श्री. गोटे तसेच श्‍याम सनेर यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न चालविले आहेत. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मालेगाव, सटाणा भागातील काही प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. डॉ. शेवाळे यांच्यासह अनेकांनी त्यास दुजोरा दिला. हे पदाधिकारी हर्षवर्धन दहिते, डॉ. विलास बच्छाव, डॉ. तुषार शेवाळे, प्रतापराव दिघावकर यांच्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. (latest marathi news)

Shyam Saner, Dr. Tushar Shewale
Dhule Loksabha Constituency : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा!

त्याशिवाय कॉंग्रेस, भाजपमधील नाराजांबरोबरच महाविकास आघाडीतील जे प्रमुख पदाधिकारी डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत त्यांनाही गळ घालत आहेत. परिवर्तन मंचच्या उद्या होणाऱ्या बैठकीला कसा प्रतिसाद मिळतो हे बघून धुळे लोकसभा विकास मंचची स्थापना करावयाची.

या मंचतर्फे सर्वसमावेशक व सक्षम उमेदवार शोधून त्याला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्याची रणनीती आहे. प्रसंगी या उमेदवारासाठी अर्थसहाय्य, लोकवर्गणी करण्याची तयारी काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. उघडपणे या बैठकीबद्दल कोणी बोलत नाही. मात्र सोशल मिडीयावर बैठकीचा निरोप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यात उमेदवारी जाहीर झालेल्या दोघा उमेदवारांपैकी डॉ. भामरे यांच्यावर निष्क्रीयतेचा आरोप करण्यात आलेला आहे. तर डॉ. शोभा बच्छाव यांच्यावर मतदार संघाबाहेरील उमेदवार असा आरोप करुन नवीन उमेदवाराची चाचणी सुरु आहे. याशिवाय एमआयएमच्या नेते व पदाधिकाऱ्यांशी ते संपर्क साधून आहेत. उद्याच्या बैठकीतच परिवर्तन मंचची फलश्रृती दिसेल. मात्र या मंचच्या बैठकीमुळे धुळे लोकसभा मतदारसंघात तुर्त आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.

Shyam Saner, Dr. Tushar Shewale
Loksabha election 2024 : राजघराण्यातील व्यक्ती ‘सत्ते’पासून दूरच; राजकीय पक्षांनी का डावललं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.