Dhule Lok Sabha Election : धुळे, साक्रीतील उमेदवाराने साधली 'हॅट्ट्रिक'

Dhule Lok Sabha Election : लोकसभेचा धुळे मतदारसंघ हा निवडणुकीत चुरशीचा आणि लक्षवेधीच ठरलेला आहे.
Chudaman Patil, Reshma Bhoye
Chudaman Patil, Reshma Bhoyeesakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : लोकसभेचा धुळे मतदारसंघ हा निवडणुकीत चुरशीचा आणि लक्षवेधीच ठरलेला आहे. या मतदारसंघात १९६२ आणि १९८० नंतर प्रत्येकी पंधरा वर्षे वर्चस्व राखत दोघा उमेदवारांनी हॅटट्रीक साधली आहे. त्यात धुळे आणि साक्री मतदारसंघातील उमेदवारांनी हे यश प्राप्त केले आहे. काँग्रेसने ही किमया साधलेली असताना भाजपने यंदा विद्यमान खासदारांना तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. ते हॅटट्रीक साधता की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress has maintained dominance in Dhule Lok Sabha constituency)

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसतर्फे स्वातंत्र्यसैनिक स्व. चुडामण आनंदा पाटील (धुळे) आणि स्व. रेशमा मोतीराम भोये (साक्री) यांनी हॅटट्रीक साधण्याची किमया केली आहे. देशात लोकसभेच्या गेल्या ७२ वर्षांत १७ निवडणुका झाल्या आहेत. त्यात स्व. पाटील आणि स्व. भोये या दोन उमेदवारांना सलग विजयाची हॅटट्रीक साधता आलेली आहे.

काँग्रेसचेच प्राबल्य

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसने ४७ वर्षे एकहाती वर्चस्व राखले आहे. यात स्व. पाटील यांनी १९६२ मध्ये एक लाख ४८ हजार ४५२ मतांनी पहिला विजय मिळविला. नंतर १९६७ मध्ये त्यांनी एक लाख ६४ हजार ३४९, तर १९७१ मध्ये दोन लाख चार हजार ४६१ मते मिळवत विजय मिळविताना हॅटट्रीक साधली. त्यांच्यामुळे मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा राहिला.

भोये यांची हॅटट्रीक

मतदारसंघात साक्री तालुक्यातील उमेदवार स्व. भोये यांनी १९८० मध्ये पहिला विजय प्राप्त केला. त्यावेळी त्यांना एक लाख ९६ हजार सहा मते मिळाली होती. पुढे १९८४ मध्ये त्यांना दोन लाख १९ हजार ३२३, तसेच हॅटट्रीक साधताना १९८९ मध्ये दोन लाख १३ हजार ५९ मते मिळाली. (latest marathi news)

Chudaman Patil, Reshma Bhoye
Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

स्व. पाटील व स्व. भोये या दोन्ही खासदारांच्या कालावधीत मतदारसंघ अनुक्रमे सर्वसाधारण व नंतर अनुसूचीत जमाती संवर्गासाठी राखीव होता. त्यावेळी ७८- कळवण, ७९- बागलाण, ८०- साक्री, ८७- शिंदखेडा, ८८- कुसुंबा, ८९- धुळे अशी मतदारसंघाची रचना होती.

आता भाजपकडे नजरा

भाजपने यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. त्यांनी २०१४ मध्ये पाच लाख २९ हजार ४५० मते मिळवित विजय संपादन केला. पुढे २०१९ ला त्यांनी सहा लाख १३ हजार ५३३ मते मिळवित सलग दुसऱ्यांदा विजयश्री मिळविली. आता ते त्यांच्या तिसऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यात ते हॅटट्रीक साधतात की काय याकडे मदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Chudaman Patil, Reshma Bhoye
Loksabha 2024: काँग्रेसचे गुन्हेगारांना प्रोत्साहन; भारत तोडोला डोक्यावर घेणारा पक्ष - प्रविण दरेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.