Dhule Lok Sabha Election: धुळे लोकसभेसाठी 55. 96 टक्के मतदान! मालेगाव मध्यला सर्वाधिक टक्का; भाजप विरुद्ध काँग्रेस चुरशीची लढत

Lok Sabha Election 2024 : रिंगणातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाल्यावर त्यांच्या निकालाचा ४ जूनला मतमोजणीतून फैसला होईल.
voting
votingesakal
Updated on

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंतच्या कालावधीत अंदाजे ५५.९६ टक्के शांततेत मतदान झाले. तापमानाचा पारा सरासरी ४३ अंशावर गेल्यावरही राष्ट्रीय लोकशाहीच्या उत्सवातील मतदानास प्रतिसाद दिलेल्या मतदारांचे जिल्हा व पोलिस प्रशासनाने आभार मानले. रिंगणातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाल्यावर त्यांच्या निकालाचा ४ जूनला मतमोजणीतून फैसला होईल. (Dhule Lok Sabha Election 56 percent voting Malegaon highest percentage)

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना निघाली. ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर ६ मेस माघारीची अंतिम मुदत संपली. त्यानंतर सोमवारी (ता. २०) मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीतील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या विधानसभा मतदारसंघात एक हजार ९५६ मतदान केंद्रे होती.

मतदानाची स्थिती

मतदारसंघात वीस लाख २२ हजार ६१ मतदार होते. त्यात दहा लाख ५१ हजार ९२८ पुरुष, तर ९८ हजार ८६ महिला, इतर ४७ मतदारांचा समावेश आहे. पैकी सकाळी सात ते सायंकाळी सहा या मतदानाच्या वेळेत ११ लाख ३१ हजार ५८० मतदारांनी मतदान केले. त्यात सहा लाख १७ हजार ७३८ पुरुष, तर पाच लाख १३ हजार ८३९ महिला, इतर तीन मतदारांचा समावेश आहे.

तसेच एकूण मतदानात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये ५७.३१ टक्के, धुळे शहर ५०.९२, शिंदखेडा ५५.१३, मालेगाव मध्य ६३.११, मालेगाव बाह्य ५४, तर बागलाण विधानसभा मतदारसंघात ५६.०४ टक्के मतदानाची नोंद झाली. (latest marathi news)

voting
Nashik Lok Sabha Election : राज्यात सर्वाधिक दिंडोरीसाठी मतदान; मतदारांचा 41 अंश सेल्सिअस तापमानातही उत्साह कायम

रिंगणातील उमेदवार

धुळे शहरातील देवपूरमधील एका मतदान केंद्रावर सकाळी तांत्रिक दोषामुळे ईव्हीएम मशिन बदलण्यात आले. मुस्लिमबहुल भागातून मोठ्या प्रमाणावर मतदानास प्रतिसाद देण्यात आला. उर्वरित समाज घटकांच्या भागात सकाळी आणि दुपारनंतर मतदानासाठी रांगा लावण्यात आल्या.

मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बूथवर राजकीय कार्यकर्ते मतदारांना मदतीसाठी सक्रिय होते. निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत आहे.

रिंगणातील १८ उमेदवार असे : जहूर अहमद मोहम्मद युसूफ (जम जम), बहुजन समाज पक्ष, शोभा दिनेश बच्छाव (काँग्रेस), सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पक्ष), नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पक्ष), शिवाजी नाथू पाटील (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मुकिम मिना नगरी (भीम सेना), शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया), अब्दुल हफीज अब्दुल हक (अपक्ष), इरफान मो. इसहाक (नादिर, अपक्ष), भरत बाबूराव जाधव (अपक्ष), मलय प्रकाश पाटील (अपक्ष), मोहम्मद आमिन मोहम्मद फारुख (अपक्ष), मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष), राज चव्हाण (अपक्ष), शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख (अपक्ष), ॲड. सचिन उमाजी निकम (अपक्ष), सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर (सुरेश बापू, अपक्ष), संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष).

voting
Loksabha Election Voting : दिंडोरीत मतदानाचा उत्साह;मुंबईत रात्री नऊपर्यंत मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.